आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला महसूल विभागाचा भार पडतोय प्रभारींच्या खांद्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांतील सुमारे 121 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे प्रशासकीय कामांना ब्रेक लागला आहे. महसूल विभागाचा भार आता प्रभारींच्या खाद्यांवर आहे. परिणामी, या रिक्त जागांमुळे काही प्रमाणात नागरिकांची महसूल विभागांतर्गत असलेली अनेक कामे रेंगाळली आहेत.

मागील काही वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या पदासह अनेक पदे रिक्त आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, लिपिक टंकलेखन, तलाठी, वाहन चालक आणि शिपाई या पदांचा यामध्ये समावेश आहे. अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या जागांमुळे नागरिकांची कामे होत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात वेळोवळी जिल्हा प्रशासनाने अनेकदा राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे. याचा परिणाम काही प्रमाणात प्रशासकीय कामकाजावर होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त जागा भरून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे. शहरासह जिल्ह्यात काही प्रमाणात महसूलचे कामे रखडली आहे. याला रिक्त पदे कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.