आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअकोला- शहरातील रस्त्यांची लागलेली वाट आणि पडलेले मोठमोठे खड्डे याबाबत जिल्हाधिकार्यांनी गंभीर दखल घेतली आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
शहरात रस्त्यांची समस्या फार मोठी आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना तसेच पादचार्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. याची काहीही तमा महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला नाही. त्यामुळे वाहनधारकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील प्रमुख मार्गांसह अनेक मार्गांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे रात्रीच्या वेळी दिसत नसल्याने अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारकांना गंभीर दुखापतदेखील झाली आहे. वाहने पंक्चर होणे, वाहनांचे पार्ट खराब होणे, या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र, त्याचे काहीही सोयरसुतक महापालिकेला नसल्याचे जाणवत आहे, याची दखल जिल्हाधिकार्यांना घेतली आहे.
प्रभारी आयुक्तांनी केली रस्त्यांची पाहणी
शहरातील खराब रस्त्यांची मनपाचे प्रभारी आयुक्तांनी आपल्या ताफ्यासह पाहणी केली. आरएलटी कॉलेजसमोर पाणी साचत असल्याने संबंधिताना नोटीस जारी करण्यात आली आहे. यासोबतच लवकरच शहरातील खड्डय़ांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
रस्ते दुरुस्त करू
शहरातील खड्डय़ांसह रस्ते दुरुस्त करण्यात येतील. काही रस्ते दुरुस्त करण्यात आले आहेत. पावसामुळे अधिक प्रमाणात खड्डे पडले आहे. तेही लवकर दुरुस्त करण्यात येतील.
-सुंदरदास भगत, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग
निर्देश देण्यात आले
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे ही मोठी गंभीर समस्या आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधिताना तातडीने रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
- अरुण शिंदे, जिल्हाधिकारी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.