आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेकलेस रस्ता झाला अरुंद; खड्डे, गिट्टीने नागरिक त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - रस्ता दुरुस्तीमधील दिरंगाई नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सिव्हिल लाइन्स चौक ते रतनलाल प्लॉट या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दुतर्फा गिट्टी टाकलेली आहे. परिणामी, रहदारीसाठी एकूण रस्त्यापैकी केवळ पाच ते सहा मीटरच रस्ता शिल्लक आहे. रस्ता दुरुस्तीला सुरुवात न झाल्याने ही गिट्टी वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे.

सिव्हिल लाइन्स ते रतनलाल प्लॉट हा मार्ग नेकलेस रोड म्हणून ओळखला जातो. या मार्गावर रुग्णालये, तयार कापड, इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचे आणि सोने-चांदी दागिने विक्रीची मोठी दुकाने आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावर खड्डे पडल्याने दुरुस्तीसाठी दोन आठवड्यांपूर्वी गिट्टी टाकलेली आहे. या गिट्टीच्या ढिगांचा वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

रस्त्याच्या कडेला थाटली दुकाने..
नेकलेस रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच दुकाने थाटलेली आहेत. त्यामुळे ग्राहकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. परिणामस्वरूप वाहतुकीची कोंडी होते.

रस्त्याची चाळणी अन् वाहतुकीची कोंडी
रतनलाल प्लॉट चौकाकडुन सिव्हील लाईन चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी दोन वेळा तयारी करण्यात आली. मात्र अद्यापही या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू झाले नाही.

गिट्टीचा ढीग
या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण असल्यामुळे या रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे.