आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात धुळीमुळे माखले रस्ते; नागरिकांचे आरोग्य झाले सस्ते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरात सर्वत्र धुळीचे लोट वाहत आहेत. त्यामुळे अकोल्याची ओळख धुळीचे शहर म्हणून होत आहे, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग फक्त धुळीचे, वायू प्रदूषणाचे प्रमाण मोजण्याचेच काम करत आहे. प्रदूषणाचे शहरात बसवण्यात आलेले तिन्ही यंत्र शोभेची उपकरणे बनली आहेत. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

प्रदूषित हवेमुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. प्रदूषणामुळे दीर्घकालीन आरोग्याच्या समस्येने श्वसनक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. प्रचंड धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढीस लागले आहे. खराब रस्ते, शहरात होत असलेले बांधकाम, शहरातून अतिरिक्त वाहतूक, ट्रान्सपोर्ट थांबा नसणे, या प्रमुख कारणांमुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रदूषण मंडळाने शहरातील प्रदूषणाची नोंद करण्यासाठी शहरात तीन केंद्रे स्थापन केली आहेत.

व्यापारी क्षेत्र म्हणून शिवाजी महाविद्यालय, औद्योगिक क्षेत्रासाठी एमआयडीसी आणि रहिवासी क्षेत्र म्हणून एलआरटी कॉलेज या ठिकाणी ही उपकरणे ठेवण्यात आलेली आहेत. ही उपकरणे आठवड्यातून दोन दिवस प्रदूषणाची नोंद घेत असतात. शहरात शिवाजी कॉलेजमध्ये प्रदूषणाची सर्वाधिक नोंद होत आहे. प्रदूषणाच्या नोंदी या उन्हाळय़ामध्ये सर्वाधिक असतात. मात्र, पावसाळा असूनही शहरात प्रमाणापेक्षा अधिक नोंद झालेली आहे. मात्र, या प्रदूषणावर प्रदूषण मंडळाचे नियंत्रण नसल्याने हा विभाग नोंदीपुरताच र्मयादित झाला आहे.

प्रदूषण म्हणजे हवेतील धुलीकरणाचे वाढलेले प्रमाण त्याला रेस्पायरेबल पार्टिक्युलेट मेंटर अर्थात आरएसपीएम म्हटल्या जाते. प्रदूषणाच्या मानकानुसार आरएसपीएमचे प्रमाण 100 मायक्रो ग्रॅम प्रती घनमीटर असायला हवे. मात्र, जुलैमध्ये हे प्रमाण 113 मायक्रो ग्रॅम प्रती घनमीटर एवढे आहे. हेच प्रमाण मार्चमध्ये सरासरीच्या अधिक होते, त्यात रहिवासी प्रभागात म्हणजे एलआरटी कॉलेजमध्ये लावण्यात आलेल्या उपकरणाने आरएसपीएमचे प्रमाण 140, औद्योगिक 150 आणि व्यावसायिक 160 आरएसपीएमची नोंद करण्यात आली होती. हे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक होते. एमआयडीमध्ये प्रदूषण जास्त असायला हवे. मात्र, त्याउलट शहरातील प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे.

घशात संक्रमण व श्वसनाचे रोग वाढले

धुळीमुळे होत असलेल्या त्रासामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रo्न वाढला आहे. दवाखान्यात रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. धूळ श्वासावाटे शरीरात जाते. धुलीकरण श्वसनात जमा होतात. अँलर्जीचा त्रास होणार्‍यांना सर्दी, खोकला, कफ होणे, धाप लागणे असे त्रास होतात, तर सर्वसामान्यांना सर्दी, खोकला आणि घशात दुखणे, असे त्रास होत आहेत. या धुलीकरणाचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे श्वसनाची क्षमता कमी होत आहे. प्रचंड धुळीमुळे श्वसनाचे विकार वाढीस लागले आहेत. हवेतील धुळीचे प्रमाण सरासरीपेक्षा वाढल्याने सर्दी खोकल्यापासून दम्यापर्यंत अनेक तक्रारी वाढल्या आहेत. शहरात होणारे बांधकाम आणि जुन्या वास्तु पाडल्या जातात. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वातावरणात धूळ मिसळते.

प्रदूषण विभागाकडे नियंत्रणच नाही

प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र प्रदूषणाच्या नोंदी घेण्यापलीकडे हा विभाग काहीही करत नाही. आकडे घेतले, तर त्यावर उपाययोजना करण्याचे काम त्या विभागाने केले पाहिजे. मात्र, त्यावर उपाययोजनाच हा विभाग करत नसेल, तर नोंदी घ्यायच्या कशासाठी, असा प्रo्न उपस्थित होत आहे. याचा कुठलाही फायदा नागरिकांना होत नाही.

आठवड्यातून दोनदा घेतल्या जातात नोंदी

धुळीचे व वायूच्या नोंदी घेण्यासाठी शहरामध्ये तीन उपकरणे बसवण्यात आली आहेत. या उपकरणाची हाताळणी करण्याचे काम शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे देण्यात आले आहे. आठवड्यातून दोन दिवस प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या जातात व तो अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठवण्यात येतो.

पाण्याचा फवारा मारावा
प्रदूषण होणार नाही याची काळजी महापालिकेने घ्यावी. प्रदूषण होऊ न देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. ज्या भागात जादा धूळ आहे. त्या भागात महापालिकेने पाण्याचा फवारा मारावा.’’ बी. आय. काळे, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी, अकोला

लहान मुलांवर प्रभाव
धुळीचा प्रभाव लहान मुलांवर जास्त जाणवतो. त्यांना अँलर्जीसारखा आजार जडू शकतो, तर अंगावर चट्टे उमटणे, पुरळ उठणे, त्वचा काळी पडणे, केस गळणे, कोंड्याचे प्रमाण वाढणे, अशाप्रकारचा त्रास धुळीमुळे होतो. डॉ. संदीप अडसड, त्चचा रोग तज्ज्ञ.

श्वसनाचे आजार
धुळीमुळे श्वसनाचे आजार आणि दम्यासारखे कायमस्वरूपी गंभीर आजार होतात. धुळीच्या आजाराचे दूरगामी गंभीर परिणामसुद्धा होतात. डॉ. दीपक मोरे