आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Akola Sarpanch Murder Case Accused Police Custody

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरपंच सिद्धेश्वर देशमुख हत्याकांड, आरोपींना कोठडी एक सप्टेंबरपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मलकापूरचे सरपंच, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सिद्धेश्वर देशमुख हत्याकांडातील आरोपी नीलेश काळंके आणि मोहन उर्फ बल्लू मार्कंड यांची न्यायालयाने मंगळवारी 27 ऑगस्टला पोलिस कोठडीत रवानगी केली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी सोमवारी 26 ऑगस्टला अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथून अटक केली होती.

पोलिसांनी 27 ऑगस्टला उपरोक्त दोन्ही आरोपींना प्रथम र्शेणी न्यायदंडाधिकारी के. के. शहा यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची 1 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. सरकारकडून अँड. व्ही. आर. पंचोली यांनी युक्तिवाद केला. आरोपींची बाजू अँड. रवींद्र कोकाटे यांनी मांडली.

असे झाले आरोपी फरार
आरोपी प्रथम अकोल्यावरून दुचाकीने बोरगावमंजू परिसरात गेले. तेथून ते मूर्तिजापूर, कारंजा आणि औरंगाबाद येथे गेले. तेथून सुरत येथे त्यांनी वास्तव्य केले. त्यानंतर ते परतवाडा येथे आले.

परप्रांतात वास्तव्याचा प्लॅन

आरोपींनी सुरतनंतर अहमदाबाद आणि तेथून माउंट अबू येथे जाण्याचा प्लॅन आखला होता. माउंट अबू येथे 15 दिवस राहून त्यानंतर ते सिक्कीममधील गंगकोट येथे वास्तव्यासाठी जाणार होते. उर्वरित. पान 4

बल्लू मार्कंड हा सिक्कीम येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होता. त्यामुळे त्याला सिक्कीमची भौगोलिक माहिती होती.

आरोपी जकात वसुलीतही सक्रिय

सिद्धेश्वर देशमुख हत्याकांडातील आरोपी नीलेश काळंके हा जकात नाक्याच्या ‘वसुली’त सक्रिय होता तसेच त्याने काही दिवस औरंगाबाद येथेही जकात नाका वसुलीचे काम केले. तो नाशिक जिल्ह्यातील जकात वसुली कंत्राटदारांच्याही संपर्कात असायचा. एकूणच तो अर्थिकदृष्ट्या कमकुवत नाही. चार ते पाच दिवस फरार राहण्यासाठी लागणारा पुरेसा पैसा त्याच्याकडे होता.

झाला युक्तिवाद..

खदानचे ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी न्यायालयात सिद्धेश्वर देशमुख हत्याकांडाचा नियोजनबद्धरीतीने कट रचल्याचे सांगितले. राजकीय वैमनस्य आणि जलस्वराज्य योजनेमधील वाद हत्याकांडाला कारणीभूत ठरला. या हत्याकांडाची पाळेमुळे खोलवर रुजली असल्याने सखोल तपास करणे गरजेचे असल्याचेही सपकाळ म्हणाले.

सरकारी वकील पंचोली यांनीही गुन्हा आणि आरोपींची पार्श्वभूमी लक्षात घेता पोलिस कोठडीची मागणी केली तसेच हेच मुख्य, खरे आरोपी असले तरी ते बाहुले आहेत. या आरोपींना नाचवणार्‍यांचा शोध आवश्यक असून, गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करणे गरजेचे असल्याचेही अँड. पंचोली म्हणाले. त्यावर हे खरे आरोपी आहे, असे तुम्ही कसे म्हणू शकता, असा सवाल आरोपींचे वकील रवींद्र कोकाटे यांनी उपस्थित केला.