आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्ज्वल भविष्याची वाट शिवचरित्रातून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - छत्रपती शिवरायांचे चरित्र, त्यांची गाथा म्हणजे जगाच्या इतिहासातील अलौकिक, अद्भुत घटना आहे. शिवरायांच्या कार्याला धर्माची जोड देऊन, दैवी चमत्कार मानून आम्ही गप्प बसलो आहोत. शिवरायांचे चरित्र जर खर्‍या अर्थाने अभ्यासले, तर उज्ज्वल भविष्याची वाट त्यातूनच सापडेल, असा दावा यवतमाळचा बालवक्ता यश चव्हाण याने येथे केला.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित जाहीर सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात बुधवारी 19 फेब्रुवारीला सायंकाळी झाली. या सभेत तो बोलत होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अभय पाटील होते. व्यासपीठावर डॉ. पुरुषोत्तम तायडे, प्राचार्य सुभाष भडांगे, पंकज जायले, पवन महल्ले, सुभाष म्हैसने, विनोदसिंग ठाकूर, मुरलीधर सटाले, संजय सूर्यवंशी, सुधीर कहाकार, आशू वानखडे आदींसह समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यश चव्हाण पुढे म्हणाला, ज्यांना इतिहास माहीत नाही ते इतिहास घडवू शकत नाही. किमान आपल्या भविष्याच्या हितासाठी इतिहास जाणून घ्या.

छत्रपतींचे कार्य सर्वांनाच प्रेरणा, दिशा व चैतन्य देणारे आहे. आमची सर्वांचीच दौलत आहेत, मात्र आम्ही उगाच त्यांना बंधनात अडकवतो. छत्रपती तर भेदभाव मिटवणारे दुवा होते. त्यांच्या नावाचा वापर आम्ही केवळ सत्तेची चव चाखण्यापुरता करतो. इतिहास बाटवण्याचे काम अनेकांनी केले आहे, त्यामुळे इतिहासाचे पुनर्लेखन होणे गरजेचे आहे. इतिहास बदलण्यापेक्षा विचार बदलण्याची गरज आहे. या वेळी बोलताना डॉ. अभय पाटील म्हणाले, आम्ही शिवरायांना मराठय़ांपुरते र्मयादित केले आहे. मराठा ही जात नाही, तर कर्तृत्वाने कमावलेला अलंकार आहे. जे मरतात पण हटत नाहीत, असे मरहट्टे म्हणजे मराठे होत. छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनकार्यातून जातीभेद विसरून सगळ्यांना संघटित करण्याचा संदेश दिला.

पोवाडे, गोंधळाची धूम
मिरवणुकीत सहभागी ज्वाला कामाक्षामाता गोंधळी कला मंचाचे उमेश पुडोळे, सुधाकर इंगोले, चेतन इंगोले, निखिल केवल, मनीष घुरडे, पप्पू मेहंगे यांनी एकापेक्षा एक सुरेख पोवाडे व गोंधळ सादर केला. ‘धन्य धन्य शिवाजी राजा जमविल्या फौजा, रांगरांगड्या मराठय़ांच्या, नौबती झळविल्या बादशहाच्या जी.जी.’ यासारखे पोवाडे लक्ष वेधत होते.