आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची अकोला शहरात साफसफाई; पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी झाडले रस्ते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मनपा कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे शहरातील रस्त्यांवर कचरा साचला आहे. या पार्श्वभूमीवर 9 ऑक्टोबरला शिवसेनेतर्फे शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

मनपातील सत्ताधारी कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि भारिप-बमसंमध्ये कुरघोडीचे राजकारणात गुंग असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. मागील पाच महिन्यांचे वेतन थकल्याने मनपाच्या कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे शहरात स्वच्छतेसह इतरही समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मदनलाल धिंग्रा चौक, टॉवर चौक, अग्रसेन चौक, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट चौक, सिव्हिल लाइन्स परिसरात स्वच्छता अभियान राबवले. या वेळी रस्त्यावरील कचरा एका ट्रॅक्टरमध्ये टाकण्यात आला.

अभियानात शिवसेना जिल्हाप्रमुख र्शीरंग पिंजरकर, उपजिल्हा प्रमुख राजेश मिर्शा, महानगराध्यक्ष तरुण बगेरे, मुकेश मुरुमकार, हरिभाऊ भालतिलक, धनंजय गावंडे, संतोष अनासने, शरद तुरकर, देवर्शी ठाकरे, गणेश पावसाळे, विनोद मापारी राजकुमारी मिर्शा, अजय शर्मा, बबलु उके, किरण ठाकूर, योगेश अग्रवाल, प्रशांत राऊत, मुन्ना मिर्शा, गजानन चव्हाण आदी सहभागी झाले होते.