आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहन महामंडळाची प्रवाशांना दिवाळी भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- राज्य परिवहन मंडळाच्या अकोला आगाराने प्रवाशांना दिवाळी भेट म्हणून अकोला-पुणे, अशी विशेष बस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोमवारी सायंकाळी आगार व्यवस्थापक ए. एम. शेंडे यांच्या हस्ते या जादा बसेसच्या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी या उपक्रमाचे प्रमुख जी. एम. अभ्यंकर प्रामुख्याने उपस्थित होते.

खासगी बसेसधारकांकडून होणारी प्रवाशांची लूट टाळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक पी. पी. भुसारी यांच्या संकल्पनेतून पुण्यासाठी जादा बसेस सोडण्याची सुविधा सुरू करण्याचे ठरले. त्यानुसार हा उपक्रम सुरू करण्यात आला. याप्रसंगी सहायक वाहतूक अधिकारी सुभाष भिवटे, वाहतूक नियंत्रक बी. एम. गिरी, करुण सिरसाठ यांच्यासह परिवहन मंडळाचे अधिकारी, कर्मचार्‍यांसह प्रवासी उपस्थित होते.


13 नोव्हेंबरपर्यंत सुविधा
अकोला-पुणे या मार्गावर दिवाळीनिमित्त 4 ते 13 नोव्हेंबरदरम्यान, एकूण 45 बसेस जादा सोडण्यात येत आहेत. सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेदरम्यान या बसेस पुण्यासाठी वेगवेगळ्या वेळेत रवाना होत आहेत. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापक ए. एम. शेंडे यांनी केले आहे.

554 रुपये भाडे
अकोला-पुणे प्रवासासाठी 554 रुपये भाडे आकारण्यात येत आहे. आरक्षणावर अतिरिक्त भार म्हणून चार रुपये, असे एकूण 559 रुपये भाडे आहे. खासगी बसेसपेक्षा या भाड्याची रक्कम अर्धी आहे.