आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोलाः आता उरल्यासुरल्या आशेवरही पाणीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यात शनिवारी रात्री मुसळधार वादळी पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळी भुईमूग, ज्वारी, संत्रा, मोसंबी, आंबा, भाजी वर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशेवरही पाणी फेरले गेले.

दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरूच आहे. वर्ष २०१३ मध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर वर्ष २०१३ च्याच फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे गहू, हरभरा हे पीक पूर्णत: हातून गेले. पुढे जून, जुलै २०१४ मध्ये अल्प पाऊस पडला. परिणामी, सोयाबीन कपाशी, या पिकांचे उत्पन्न घटले. दरम्यान, फेब्रुवारी आणि मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात गारपीट झाली. त्यामुळे गहू, हरभरा, फळबाग यांचे नुकसान झाले. यातून जे पीक वाचले ते शनिवारी रात्री झालेल्या वादळी पावसाने पूर्णत: हातून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

शनिवारी सायंकाळी वाजतापासूनच वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. ग्रामीण भागातील अनेक घरांवरील टिनपत्रे वाऱ्यामुळे उडून गेलीत. अकोला शहरात सायंकाळी ५.५० ते ६.३० या वेळेत झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिक व्यावसायिकांची एकच धांदल उडाली. या पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी लदबदलेल्या आंब्यांच्या कैऱ्या गळून गेल्या आहेत, तर मोसंबी, संत्रांच्या बागेतही फळांचा खच साचला आहे. ही परिस्थिती कांदा, उन्हाळी भुईमूग या पिकांची झाली आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेला मालभिजला आहे. परिणामी, कमी भावात त्यांना आपले उत्पन्न विकावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीचे सर्वेक्षण करून पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

अक्षय तृतीयाच्या खरेदीवर परिणाम?
देशातीलएकूण सोन्याच्या खरेदीपैकी ५० टक्के खरेदी ही ग्रामीण भागातून होते. विशेष म्हणजे, सोन्याच्या वार्षिक विक्रीचा आढावा घेतला, तर १५ ते २० टक्के विक्री एकट्या अक्षयतृतीयाला होते. मात्र, अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले. परिणामी, यंदा अक्षयतृतीयेच्या बाजारावर अवकळा येऊन सोन्याच्या मागणीत ७०० टनांपर्यंत घट होऊ शकते, असा अंदाज इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन वर्तवला आहे.

सर्वेक्षणाचेआदेश
अवेळीपावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या सर्व्हेचे आदेश जिल्हा प्रशासनाने महसूल यंत्रणेला दिले आहेत. मात्र, शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे नेमके किती नुकसान झाले याचा आकडा महसूल विभागाकडून मिळू शकला नाही.

आंब्यांचे भाव वाढणार
वादळीपावसामुळे सर्वाधिक नुकसान आंबा पिकाचे झाले. हातातोंडाशी आलेले आंबे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गळून गेले. त्यामुळे उत्पन्न घटणार आहे. परिणामी, मागणी तसा पुरवठा राहणार नसल्याने भाव वाढणार असल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
काय करावं?
बरसादीतकमी पाऊस झाला. त्यामुळं सोयाबीन गेलं. आता जे काही हाती यायचं ते वादळी अवकाळी पावसानं हिरावून घेतलं. शेतकऱ्यानं कसं जगावं? हे तुम्हीच सांगा.''
सूर्यभानयादवराव डाबेराव, शेतकरी रा. कट्यार.

पावसानं नुकसान
आतालोक कव्हा आस झालं नायी ते या दोन सालात होऊ राह्यलं. इगीन सुरूच हाय. मले काय समजून राह्यलं नाय. पीक चांगलं आलं आहे. पण, पावसानं नुकसान होतं आहे.''
लक्ष्मणपांडुरंग चोथवे, रा. आलेगाव

फोटो - असा पडला पाऊस (शनिवार सकाळी ते रविवार सकाळी पर्यंत)
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, जिल्ह्यात कुठे किती पडला पाऊस...