आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अकोला अर्बन’ची कर्जदारांकडून 64 कोटींनी फसवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दि अकोला अर्बन को-ऑप. बँक, अकोलाच्या मुख्य शाखेतून तब्बल 64 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते न भरता बँकेची मोठी फसवणूक केल्याची तक्रार मुख्य शाखेचे शाखाधिकारी दीपक भाटिया यांनी कोतवाली पोलिसात गुरुवार, 10 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान केली.

दि अकोला अर्बनच्या मुख्य शाखेत तत्कालीन सरव्यवस्थापक ओ. टी. राठी यांच्याशी संगनमत करून सन 1999 ते 2000 या वर्षात सुमारे 17 गैरअर्जदारांनी 64 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप पोलिस तक्रारीत केला आहे. गैरअर्जदार मे. शंकर उद्योगचे सात भागीदार अधिक दोन यांनी 12 कोटी 50 लाख, मे. संजय कॉटन कंपनीचे तीन भागीदार अधिक दोन तीन कोटी 60 लाख, मे. शंकरलाल सत्यनारायणचे भागीदार अधिक दोन 10 कोटी 90 लाख, मे. जोशी इंटरप्राईजेस प्रो. प्रा. विनोद सत्यनारायण लोहिया अधिक दोन एक कोटी, मे. एम. के. सन्सचे भागीदार चार अधिक दोन 82 लाख 86 हजार 800 रुपये, ओमप्रकाश तुळशीराम राठी अधिक एक 19 लाख 25 हजार, मे. रामचंद्र रामगोपालचे भागीदार चार अधिक दोन 12 कोटी दोन लाख 50 हजार, मे. नवलजी कॉटन स्पीनचे संचालक 11 अधिक दोन एक कोटी 44 लाख 63 हजार 600 रुपये, मे. कोठारी ब्रदर्सचे भागीदार चार अधिक दोन चार कोटी 71 लाख 17 हजार 110 रुपये, मे. नवलजी कॉटन स्पीनचे भागीदार चार अधिक दोन 50 लाख, मे. आदर्श दाल मिलचे भागीदार पाच अधिक दोन चार कोटी आठ लाख, मे. गिरीश बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सचे भागीदार पाच अधिक एक तीन कोटी 54 लाख 41 हजार 609 रुपये, मे. अनुश्री डेव्हलपर्सचे तीन अधिक एक चार कोटी चार लाख 22 हजार 523 रुपये, मे. अनुश्री डेव्हलपर्स प्रो. प्रा. अधिक दोन 61 लाख तीन हजार 700 रुपये, मे. कोठारी कर्मशियल कॉम्प्लेक्सचे भागीदार तीन अधिक सात चार कोटी सात लाख एक हजार 292 रुपये, सचिन रमेशचंद्र मुंदडा अधिक दोन 69 लाख नऊ हजार 931 रुपये, पामनदास विरुमल अधिक दोन एक लाख 60 हजार 760 रुपये असे एकूण 64 कोटी रुपयांचे बँकेचे कर्ज न भरून बँकेची फसवणूक केल्याची तक्रार शाखाधिकारी दीपक बनराज भाटिया यांनी कोतवाली पोलिसात केली आहे.

अहवालानंतर कारवाई
बँकेच्या लेखापरीक्षण अहवालाची कसून तपासणी करण्यात येईल. यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.’’ जगदीश गायकवाड, ठाणेदार, कोतवाली पोलिस ठाणे, अकोला.