आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला अर्बन बँक : कर्जाची कागदपत्रे पोलिस घेणार ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दि अकोला अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या मुख्य शाखेत 64 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. याप्रकरणी शुक्रवारी कोतवाली पोलिसांनी काही गैरअर्जदारांची विचारपूस केली असून, संशयास्पद कर्ज प्रकरणातील दस्तऐवज पोलिस ताब्यात घेणार आहे.

दि अकोला अर्बनच्या मुख्य शाखेत तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश रामचंद्र राठी यांच्याशी संगनमत करून 1999 ते 2000 या वर्षात 17 गैरअर्जदारांनी 64 कोटी चार लाख रुपयाने बँकेची फसवणूक केल्याची तक्रार मुख्य शाखेचे शाखाधिकारी दीपक भाटिया यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री केली आहे. गैरअर्जदारांमध्ये मे. शंकर उद्योगचे भागीदार सत्यनारायण लोहिया, मृतक, किसन बन्सीलाल लढ्ढा, विनोद लोहिया, संजय लोहिया, प्रमोद लोहिया, मदन लढ्ढा, ओ. टी. राठी, दिलीप बडगे यांचा समावेश आहे. यांनी 12 कोटी 50 लाखांची फसवणूक केली आहे. यासोबतच मे. संजय कॉटन कंपनीच्या भागीदारांमध्ये विनोद लोहिया, प्रमोद लोहिया, गंगादेवी लोहिया, ओ. टी. राठी, प्रमोद लोहिया, दिलीप बडगे यांचा समावेश आहे. त्यांनी तीन कोटी 60 लाख, मे. शंकरलाल सत्यनारायणच्या भागीदारीमध्ये विनोद लोहिया, संजय लोहिया, राजेश लोहिया, प्रमोद लोहिया, ओ. टी. राठी, दिलीप बडगे यांनी एक कोटी दहा लाख, गिरीश बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या भागीदारीत गिरीश रामविलास कोठारी, उमेश कोठारी, जयप्रकाश कोठारी, उषादेवी नंदकिशोर कोठारी, संगीता जुगलकिशोर कोठारी, सुभा संतोष कोठारी, ओ. टी. राठी यांनी एक कोटी 75 लाख, ऋषिक इंटरप्राईजेस भागीदारीमध्ये विनोद लोहिया, ओ. टी. राठी, दिलीप बडगे यांनी एक कोटी, कोठारी कर्मशियल कॉम्प्लेक्सच्या भागीदारीमध्ये उषा नंदकिशोर कोठारी, संगीता जुगलकिशोर कोठारी, सुभा संतोष कोठारी, संतोष नवलकिशोर कोठारी, हुकमीचंद रामचंद्र लाहोटी, नंदू कोठारी, शंकुतलाबाई नवलकिशोर कोठारी, जुगलकिशोर नवलकिशोर कोठारी, ओ. टी. राठी यांनी तीन कोटी 20 लाख, सचिन रमेशचंद्र मुंदडा यांच्या भागीदारीमध्ये दिलीप बडगे, ओ. टी. राठी यांनी 57 लाख 78 हजारांनी फसवणूक केली.

अनुश्री बिल्डर्स या भागीदारीत प्रशांत जुगलकिशोर राठी, दिलीप बडगे, ओ. टी. राठी यांनी 50 लाख 25 हजार, अनुश्री डेव्हलपर्स भागीदारीमध्ये प्रशांत राठी, उमेश रामविलास कोठारी, संगीता कोठारी व ओ. टी. राठी यांनी दोन कोटी, दिलीप बडगे व ओ. टी. राठी यांनी या भागीदारीमध्ये 19 लाख 25 हजार, पामनदास विरूमल या भागीदारीमध्ये दिलीप बडगे व ओ. टी. राठी यांनी 70 हजार, एन. के. सन्स या भागीदारीमध्ये शकुंतला नवलकिशोर कोठारी, नंदू कोठारी, जुगलकिशोर कोठारी, संतोष कोठारी, ओ. टी. राठी, दिलीप बडगे यांनी 82 लाख 86 हजार 800 रुपये, रामचंद्र रामगोपाल या उद्योगाच्या भागीदारीमध्ये शकुंतला कोठारी, नंदू कोठारी, जुगल कोठारी, ओ. टी. राठी, दिलीप बडगे यांनी चार कोटी 71 लाख 17 हजार, नवलजी कॉट्स स्पिन्स या भागीदारीमध्ये जुगलकिशोर गोवर्धनदास करवा, गोपालदास मोहता, आनंद गोपालदास मोहता, ओ. टी. राठी, दिलीप बडगे यांनी 50 लाख रुपयांनी फसवणूक केली.

नवलजी कॉट्स स्पिन्स लि. कंपनीच्या भागीदारीत नंदकिशोर कोठारी, जुगलकिशोर कोठारी, मुरली मनोहर मालपाणी, एच. आर. लाहोटी, आशिष डागा, जुगलकिशोर अटल, सुरेश अटल, प्रकाश लढ्ढा, नरसिंग लढ्ढा, विनोद लोहिया, श्रींरग रामरतनजी चांडक, ओ. टी. राठी, दिलीप बडगे यांनी एक कोटी 48 लाख 63 हजार 600 रुपये, आदर्श दाल मिल भागीदारी संस्थेमध्ये राजेंद्र करवा, अजय करवा, अमोल करवा, शांतादेवी करवा, पुष्पादेवी करवा, ओ. टी. राठी, दिलीप बडगे यांनी चार कोटी आठ लाख अशी एकूण 64 कोटी चार लाख रुपयाने दि अकोला को-ऑप. बँकेची फसवणूक केल्याची तक्रार कोतवाली पोलिस ठाण्यात केली आहे.