आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला अर्बन बँकेवर "जनकल्याण'चे वर्चस्व, पॅनलचे उमेदवार प्रचंड मताधिक्क्याने विजयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- येथील अकोला अर्बन को-ऑप. बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत जनकल्याण पॅनलचे नऊ उमेदवार प्रचंड मताधिक्य घेऊन विजयी झाले, तर ज्यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक प्रक्रिया घेण्याची गरज भासली ते पुरुषोत्तम त्र्यंबक व्यास यांना केवळ ४३९ मते मिळाली.
वर्धमान भवनात सकाळी ११ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी नीळकंठ करे यांनी निकाल जाहीर केला. या निवडणुकीसाठी मतदारांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याची चर्चा मतमोजणीस्थळी होती. आर्थिक मागासवर्गीय गटातून प्रतिनिधीपदी राजाभाऊ बढे, मूर्तिजापूर, मागासवर्गीयातून प्रमोद शिंदे, शाखा समिती सदस्य म्हणून अमरिकसिंग वारसीकर, नांदेड, गोविंद सारडा, विजयकुमार झुनझुनवाला, अकोट, घनश्यामदास मकराणिया, अमरावती, महिला प्रतिनिधी म्हणून रेखाताई खंडेलवाल, मंजूषाताई सोनटक्के बिनविरोध निवडून आल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा नीळकंठ करे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था बाळापूर एस. पी. कोहरे, उमेशचंद्र हुसे, बुलडाणा, जी. जी. पवार, मालेगाव यांनी काम पाहिले
गटातूनप्रतिनिधीपदी राजाभाऊ बढे, मूर्तिजापूर, मागासवर्गीयातून प्रमोद शिंदे, शाखा समिती सदस्य म्हणून अमरिकसिंग वारसीकर, नांदेड, गोविंद सारडा, विजयकुमार झुनझुनवाला, अकोट, घनश्यामदास मकराणिया, अमरावती, महिला प्रतिनिधी म्हणून रेखाताई खंडेलवाल, मंजूषाताई सोनटक्के बिनविरोध निवडून आल्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा नीळकंठ करे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था बाळापूर एस. पी. कोहरे, उमेशचंद्र हुसे, बुलडाणा, जी. जी. पवार, मालेगाव यांनी काम पाहिले.
उमेदवार मते-
रमेशदेशपांडे ७,९१९
रामेश्वर फुंडकर ७९०४
राजेंद्र जोगळेकर ७,८९७
शंतनू जोशी ७,९१७
संजय कोटक ७८८९
हरीश लाखाणी ७,८५६
मोहनलाल नथ्थाणी ७,८४४
नरेंद्र पाठक ७,८७८
शैलेश वखारिया ७,७६४