आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दि अकोला अर्बन को-ऑप. बँके फसवणूक : खातेदार चिंताग्रस्त; कर्जदार, आरोपी बिनधास्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दि अकोला अर्बन को-ऑप. बँकेने फसवणूक प्रकरणासह 72 कोटींचे थकित कर्ज नफ्यातून तयार होणार्‍या राखीव निधीतून वळते केल्यानंतर खातेदार चिंताग्रस्त असून, कर्जदार आरोपी मात्र बिनधास्त असल्याचे दिसून येत आहे. बँकेच्या वकिलांनी आरोपींविरुद्ध आणखी काही एफआयआर दाखल होणार असल्याचे जुलैमध्ये न्यायालयात सांगितले होते. मात्र, असे असतानाही बँकेकडून आणखी तक्रारीसाठी अपेक्षित हालचाली होत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे बँकेच्या अर्थात खातेदार आणि भागधारकांच्या पैशांवर डल्ला मारणार्‍यांना वाचवणार्‍यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

दृष्टिक्षेप घोटाळ्यावर..

कर्ज प्रकरण मंजुरीसाठी संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येत नव्हते. नियमानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत कर्ज प्रकरणाबाबत निर्णय घेण्यात येतो. कर्ज प्रकरणातील लेजरमधील नोंदी संगणकात करण्यात येत नव्हत्या. त्यामुळे लेजरमधील नोंदी आणि संगणकातील नोंदीमध्ये तफावत आढळून आली होती.


कर्जवसुलीला प्राधान्य
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे. अकोला अर्बन बॅकेच्या वतीने प्रथम कर्जवसुली करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. कर्जवसुली न झाल्यास तक्रारी देण्यात येतील.’’ शंतनू जोशी, व्यवस्थापकीय संचालक,अकोला अर्बन को-ऑप बॅँक