आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठ्यात पुन्हा व्यत्यय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरांतर्गत पाणीपुरवठा करणार्‍या अशोक वाटिकेजवळील व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने शहरातील अंतर्गत पाणीपुरवठ्यात पुन्हा व्यत्यय निर्माण झाला आहे. परिणामी, एक मे रोजी झोन क्रमांक एकला होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे दोन मे रोजी झोन क्रमांक एक दोनला पाणीपुरवठा केला जाणार आहे.

महान येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पंप तकलादू झाल्याने एकूण तीन पंपांच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे अधिक प्रमाणात पाण्याची उचल करता येत नाही. त्यामुळेच शहराला पाच भागात विभागून पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, आता उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढल्याने सहा दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने सादर केला आहे. अद्याप या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही. परंतु, येत्या काही दिवसात सहा दिवसांआड पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

एक मे रोजी पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार झोन क्रमांक एकला पाणीपुरवठा होता. झोन क्रमांक एक जुने शहरात आहे. झोन क्रमांक एकमधील संपूर्ण भागाला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. एक मे रोजी सायंकाळपर्यंत व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम पूर्ण होणार होते. त्यामुळे दोन मे रोजी झोन क्रमांक एकला पाणीपुरवठा करतानाच झोन क्रमांक दोनला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला. नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल अकोला महापालिका पाणीपुरवठा विभाग दिलगीर आहे. नागरिकांनी तांत्रिक अडचण समजून घेऊन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील काळे यांनी केले आहे.

झोन क्रमांक दोन
जयहिंद चौक, काळा मारुती मंदिर परिसर, शिवचरणपेठ, शिवसेना वसाहत, बाळापूर रोड, आळशी प्लॉट, एरिगेशन कॉलनी, निमवाडी, रामदास मठ, विजयनगर, शेलारफैल, तोष्णीवाल लेआऊट, निवारा कॉलनी, सरस्वतीनगर, गणेशनगर, विद्युत कॉलनी, कपिलवस्तूनगर, परिवार कॉलनी, सिद्धीविनायकनगर, चवरे प्लॉट, सोनी कॉलनी, मित्रनगर, युसूफ अली खदान, बळवंत कॉलनी.

आज या भागाला पाणी
ताजनगर,पोळा चौक, सोनटक्के प्लॉट, भारती प्लॉट, शिवनगर, इंदिरा कॉलनी, गोडबोले प्लॉट, रेणुकानगरचा काही भाग, शांतीनगर, ज्ञानेश्वरनगर, फडकेनगर, जोगळेकर प्लॉट, कोमटीपुरा, शिवाजीनगर, गोंडपुरा, खदान, सिंधी कॅम्प, बाजोरियानगर, कैलास टेकडी, शास्त्रीनगर, अशोकनगर, राजीवनगर, अकबर प्लॉट, नुरनगर, बापूनगर, लहान उमरी, दत्तवाडी, विठ्ठलफैल, गजाननपेठ.