आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१५ लघू प्रकल्पात डेड स्टोरेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील ३२ पैकी १५ लघू प्रकल्पांनी मृतसाठ्याची पातळी गाठली आहे, तर सात लघू प्रकल्पांची वाटचाल डेड स्टोरेजच्या दिशेने सुरू आहे. परिणामी, जिल्ह्याच्या काही ग्रामीण भागांत ग्रामस्थाना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पावसाने दडी मारल्यास जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

जिल्ह्यात एक मोठा, तीन मध्यम आणि ३२ लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन, औद्योगिक वसाहतीला पाणी दिले जाते, तसेच नागरिकांची तहान भागवली जाते. मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने निर्गुणा प्रकल्प वगळता इतर कोणत्याही प्रकल्पाने १०० टक्के पाण्याची पातळी गाठली नाही. त्यामुळेच दिवाळीपासून खऱ्या अर्थाने पाणीटंचाईला प्रारंभ झाला, तर सिंचन क्षेत्रातही घट झाली, तर आता पाणीटंचाईच्या झळा शहरासह ग्रामीण भागाला बसत आहेत. शहरात पाच दिवसांआड सुरू असलेला पाणीपुरवठा सहा दिवसांआड करण्यात आला, तर आता सात दिवसांआड करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. परंतु, लघू प्रकल्पांनी मृतसाठ्याची पातळी गाठल्याने ग्रामीण भागाला मात्र तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. १५ लघू प्रकल्पांनी मृतसाठ्याची पातळी गाठली.

या प्रकल्पांनी गाठला डेड स्टोरेज
सिसा उदेगाव, कुंभारी, पिंपळशेंडा, सावरखेड, जनुना, घोटा, कानडी, घोंगा, मोऱ्हळ, हातोला, कसुरा, तामसी, दगड पारवा, सुकळी, शिवण खुर्द या १५ लघू प्रकल्पांनी डेड स्टोरेजची पातळी गाठली आहे, तर पातूर, सावरगाव बांध, तुळजापूर, उमा, भिलखेड, धारुर, झोडगा हे प्रकल्प डेड स्टोरेजच्या मार्गावर आहेत.