आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Z P Election Bharip Bahujan Mahasangha Win

अकोला जिल्हा परिषदेवर ‘भारिप-बमसं’चे वर्चस्व, चार अपक्षांचा कौल निर्णायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा परिषदेच्या 13 वगळता अन्य सर्व गटांमध्ये मतदारांनी परिवर्तन घडवून आणले. या निवडणुकीत पाच गटांची निर्मिती झाली. उर्वरित तब्बल 35 गटांमधील सत्ताधारी पक्षाला मतदारांनी नाकारले आहे.
हिवरखेड (भारिप), पाथर्डी (भारिप), बेलखेड (भाजप), भांबेरी (भारिप), दहिहांडा (शिवसेना), उगवा (शिवसेना), भौरद (शिवसेना), कुरणखेड (भारिप), शिवणी (भारिप), मलकापूर (भारिप), जनुना (भारिप), बाश्रीटाकळी (काँग्रेस) व जांबवसू (काँग्रेस) या 13 गटांमध्ये मतदारांनी पुन्हा विद्यमान सत्ताधारी पक्षांना कौल दिला. जिल्हा परिषद गट पुनर्रचनेत या वेळी अस्तित्वात आलेल्या पाच गटांपैकी हातगाव (मूर्तिजापूर) आणि देगाव (बाळापूर) हे दोन गट शिवसेनेने काबीज केले. खडकी बुद्रूक (अकोला), निमकर्दा (बाळापूर) आणि घुसर (अकोला) हे उर्वरित तीन नवनिर्मित गट भारिपने पटकावले.
दहिगाव (तेल्हारा), हातरुण (बाळापूर), चोंढी (पातूर) आणि दानापूर (तेल्हारा) हे चार गट भाजपला राखता आले नाहीत. भारिपने उमरा, अकोली जहांगीर, सिरसो, आगर, बोरगाव मंजू, पातूर-नंदापूर, अंदुरा, पारस, वाडेगाव आणि कान्हेरी सरप आणि शिर्ला हे गट गमावले.
मतदारांनी घडवलेल्या परिवर्तनात अपक्षांच्या ताब्यातील आसेगाव बाजार, कुटासा, चिखलगाव, पिंजर आणि सस्ती हे गट विविध पक्षांनी काबीज केले. शिवसेनेला अकोलखेड, जामठी बुद्रूक, बाभुळगाव, महान, राजंदा, मळसूर हे गट राखता आले नाही. यापैकी जामठी बुद्रूक (अपक्ष) वगळता अन्य चारही गट भारिपने शिवसेनेकडून बळकावले. काँग्रेसच्या ताब्यातील अडगाव बु., चोहोट्टा बाजार, लाखपुरी, माना, उमरी प्रगणे बाळापूर आणि व्याळा हे गट इतर पक्षांनी बळकावले आहेत. मुंडगाव, कुरुम आणि आलेगाव या गटात गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेली राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिक टिक अनुक्रमे शिवसेना, भारिप आणि भाजपने बंद केली. भारिपने आसेगाव बाजार, कुटासा, सस्ती, अकोलखेड, बाभुळगाव, महान, राजंदा, मळसूर, अडगाव बु., चोहोट्टा बाजार, माना, व्याळा आणि कुरुम हे 13 गट अन्य पक्षांकडून बळकावले. उमरा आणि वाडेगाव हे भारिपचे दोन गट काँग्रेसने बळकावले, तर दहिगाव आणि पातूर नंदापूर हे दोन गट राष्ट्रवादीने इतरांकडून ताब्यात घेतले.
शिवसेनेने आगर, बोरगाव मंजू, कान्हेरी सरप, उमरी प्रगणे बाळापूर आणि मुंडगाव या गटात विद्यमान पक्षांना पराभवाची धूळ चारली. अन्य पक्षांच्या ताब्यात असलेले सिरसो, अंदुरा, पारस, शिर्ला, चिखलगाव, पिंजर, लाखपुरी आणि आलेगाव या गटांमध्ये मतदारांनी भाजपचे कमळ फुलवले. दानापूर, अकोली जहांगीर, जामठी बु. आणि चोंढी या चार गटांमध्ये परिवर्तन घडवणार्‍या मतदारांनी अपक्षांना कौल दिला.

पुढील स्लाइडमध्ये, चार अपक्षांचा कौल निर्णायक व नीळ आणि गुलाल