आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Zilha Parishad Civik Body Meet On 15 December

अकोला जिल्हा परिषदेच्या ‘स्थायी’ची सरत्या वर्षात 15 ला सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- सरत्या वर्षात जिल्हा परिषदेची स्थायी समितीची शेवटची सभा 15 डिसेंबरला, तर 21 डिसेंबरला शेवटची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांचा आढावा या सभेत घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत ग्राम विकास मंत्रालयाचा निर्णय झाल्यानंतर 30 डिसेंबरला अध्यक्षपदाची निवड होणार आहे. तत्पूर्वी पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जिल्हाधिकारी 8 डिसेंबरला जाहीर करतील. त्यानंतर 28 डिसेंबरला पंचायत समिती सभापतीपदाची निवड होणार आहे.
जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित सदस्य 15 च्या स्थायी समिती व 21 डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेपासून वंचिंत राहतील. त्यांना आणखी तब्बल 26 दिवस जिल्हा परिषदेपासून दूरच राहावे लागणार आहे.