आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akola Zilha Parishad Election Bharip Bahujan Mahasangha Win

राजकारण: अकोल्यात अपक्षांना ‘भाव’; ‘पतंग’ला मदतीचा ‘हात’?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- स्थानिक स्वराज्य संस्थेत महत्त्वपूर्ण असणार्‍या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल सोमवारी हाती आला. या निकालाची आकडेवारी लक्षात घेता जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्यासाठी भारिप-बमसं, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती हे दावेदार ठरले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका यात महत्त्वाची ठरणार असून, अपक्षांचेही भाव वधारले आहेत.
भारिप बहुजन महासंघाने पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक 23 जागा मिळवत जिल्हय़ातील सर्वात मोठा पक्ष म्हणून नावलौकिक मिळवला आहे. त्यापाठोपाठ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवली. भाजपला 11 तर शिवसेनेला आठ जागा मिळाल्या. काँग्रेसला पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर धन्यता मानावी लागली, तर चार अपक्षांनी बाजी मारली आहे. निवडणूक निकालाचे चित्र लक्षात घेता कोणत्याही पक्षाकडे सत्तेसाठी झुकते माप दिसत नाही. त्यामुळे भारिप बहुजन महासंघाला जर सत्ता काबीज करावयाची असेल तर काँग्रेस किंवा अपक्षांना हाताशी धरावे लागेल, तसेच भाजप-शिवसेनेच्या युतीला सत्तेसाठी अपक्ष व राष्ट्रवादी व काँग्रेसची मनधरणी करावी लागेल. भारिप-बमसं आणि युतीला सत्तेसाठी इतर पक्षाचा आधार घेऊनच जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करता येईल.
राष्ट्रवादीलाही ‘फटका’
अगदी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत युती न करण्याचा निर्णय घेतला होता. पक्ष निरीक्षक व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा निवड मंडळाने उमेदवार निश्चित केले. निवडणुकीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रय}ही केले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरी मात्र केवळ दोनच जागा आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. जिल्हयातील सहकार नेत्यांनी मदतीचा हात न दिल्याने पक्षाची अवस्था बिघडली अशी चर्चा राजकीय वतरुळात सुरू होती.
भाजपचे ‘राजकारण’
निवडणुकीच्या तोंडी शिवसेनेसोबत युती करून डाव साधला. जिल्हा परिषदेत भाजपला 11 जागा पटकावण्यात यश आले, तर शिवसेनेला मात्र आठ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजपसोबत युती करून शिवसेनेला फार अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात युतीचा फायदा मात्र भाजपलाच झाला. त्यामुळे भाजपचे राजकारण यशस्वी ठरले, असेच म्हणावे लागेल. भाजप पदाधिकार्‍यांनी शिवसेनेचा ‘वापर’ करून घेतल्याची चर्चा राजकिय वतरुळात सुरू होती. भाजपाने रणधीर सेना स्थापन करत पक्षातील इतर नेत्यांना चपराक लगावली. रणधीर सेना यशस्वी झाली की पक्ष हे यावर परिवारात विचारमंथन सुरू आहे. खासदार संजय धोत्रे यांच्यासाठी निवडणूकीतील विजय लोकसभा निवडणूकीसाठी शुभसंकेत असतील.

मनसेचे इंजिन ‘फेल’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन जिल्हाध्यक्ष अकोल्यात आहेत. विजय मालोकार व रामा उंबरकार यांना एकाही ठिकाणी विजय मिळविता आला नाही. मनसेचे इंजिन घसरल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू होती.
काँग्रेसला ‘दणका’
2003 व 2008 प्रमाणेच 2013 च्या निवडणुकीतसुद्धा काँग्रेसला दणका बसला आहे. पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांचे निवडणुकीवर लक्ष असतानाही निवडणुकीत काँग्रेसला केवळ पाच जागांवरच समाधान मानावे लागले. 2003 व 2008 मध्ये आठ जागा मिळवलेल्या काँग्रेसने या निवडणुकीत केवळ पाच जागा मिळवल्या. जिल्हय़ात काँग्रेसचे पालकमंत्री असताना पक्षाचा दारुण पराभव होणे, ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे उमेदवार ताटकळत होते.

भारिप-बमसंची ‘मुसंडी’
जिल्हा परिषदेवर दोन वेळा जिंकत तिसर्‍यांदाही भारिप बमसंने मुसंडी मारली. या निवडणुकीत 23 जागांवर विजय प्राप्त केला आहे. राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांचे जातीय समीकरण या निवडणुकीत जुळल्याची चर्चा राजकीय वतरुळात सुरू आहे. त्यांना जिल्हा परिषदेत मिळालेल्या विजयामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांना जनमताचा कौल कसा मिळतो, याकडे राजकीय वेिषकांचे लक्ष आहे. तर भारिप-बमसंच्या आमदारांच्या मतदार संघात पक्षाला आलेले
अपयश ही चिंतेची बाब आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी असा गुलाल उधळून जल्लोष केला.