आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने दिली नव्यांना पसंती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भारतीय जनता पक्षाने शनिवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये जिल्हा परिषदेचे 16, तर पंचायत समितीच्या 41 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. भाजपने नव्या उमेदवरांना पसंती दिली. तीन पंचायत समिती सदस्यांना पुन्हा संधी देण्यात आली. बहुतांश विद्यमान सदस्यांना भाजपने डच्चु देत धक्कातंत्राचा वापर केला.
अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती झाली असून, त्यामध्ये भाजपच्या वाट्याला 23 जागा आल्या आहेत. त्यापैकी 16 उमेदवारांच्या नावाची घोषणा शनिवारी भाजपने केली. उर्वरित सात जागांचे उमेदवार रविवारी जाहीर करण्यात येतील, युतीतील शिवसेनेने आपली पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली होती. भाजपने आज जाहीर केलेल्या यादी त अकोला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन, पंचायत समितीच्या तीन, पातूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन, पंचायत समितीच्या पाच, मूर्तिजापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन, पंचायत समितीच्या चार, बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन, पंचायत समितीच्या चार, बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन पंचायत समितीच्या पाच, तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार, पंचायत समितीच्या पाच, अकोट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एक, पंचायत समितीच्या पाच, बार्शिटाकळीच्या जिल्हा परिषदेच्या एक व पंचायत समितीच्या आठ जागांची घोषणा करण्यात आली.
पंचायत समिती सदस्य रमण जैन यांना आलेगाव येथून जिल्हा परिषद निवडणुकीत उतरवले आहे. दोन पंचायत समिती सदस्यांना पुन्हा उमेदवारी दिली. भाजपच्या 15 पंचायत समिती सदस्यांपैकी तीन सदस्यांना पुन्हा संधी दिली. भाजपच्या जिल्हा परिषदेतील चार सदस्यांपैकी एकाही सदस्याला पहिल्या यादीत पुन्हा संधी दिली नाही. भाजपच्या यादीत विशिष्ट समाजाच्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे जाणवते. त्यामुळे उमेदवारी देताना इतर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित केले आहे. उद्या जाहीर होणार्‍या दुसर्‍या यादीत एका जिल्हा परिषद सदस्याला संधी मिळणार असल्याची माहिती आहे. त्या जागेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपली प्रतिष्ठापणाला लावली आहे. शिवसेना ही त्या जागेवर आपला उमेदवार उभा करण्यासाठी ठाम आहे. त्यामुळे या जागेवरून युतीत वादाची ठिंणगी पडण्याची शक्यता आहे.