आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाच्या काळात केला पाणीपुरवठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मलकापूर व खडकी ग्रामपंचायत परिसरात मतदानाच्या काळात पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे या वेळेत मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी नागरिकांनी पाठ फिरवली होती.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. मलकापूर गट व गणासाठीदेखील या वेळी मतदान झाले. मतदानाच्या काळात मलकापूर ग्रामपंचायत परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामुळे मतदान करण्यापूर्वी मलकापूर व खडकी ग्रामपंचायत परिसरात राहणार्‍या नागरिकांनी घरातील पाणी भरण्यास पसंती दिली. त्यानंतर नागरिकांनी मतदानाचा हक्कदेखील बजावला. मतदारांना मतदानापासून परावृत्त ठेवण्यासाठी मतदानाच्या काळात पाणीपुरवठा करण्यात आला, असा आरोप काही उमेदवारांनी केला आहे. मात्र, मतदानावर त्याचा फारसा प्रभाव झाला नाही.
मद्यपीचा गोंधळ
मतदानादरम्यान खडकी परिसर शाळेतील मतदान केंद्रावर एका मद्यपी युवकाने गोंधळ घातला. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेऊन त्याला मतदान कक्षात जाण्यापासून रोखून तातडीने ताब्यात घेतले. सायंकाळी त्याला समज देऊन सोडून देण्यात आले.