आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज लागणार निकाल; अकोला जिल्ह्यात सरासरी 64 टक्के मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेच्या 53 गटांसाठी व पंचायत समितीच्या 106 गणांसाठी 1 डिसेंबरला सरासरी 64 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाच्या सूत्रांनी दिली.
या निवडणुकीसाठी रिंगणातील एकूण 875 उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल 2 डिसेंबरला लागणार आहे. सकाळी 10 वाजेपासून प्रत्येक तालुक्याच्या निकालाची प्रक्रिया त्याच ठिकाणी सुरू होणार आहे. या महत्त्वपूर्ण निकालाची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. राज्यात धुळे, नंदुरबार आणि अकोला या तीन जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम 11 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता. त्याप्रमाणे 11 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरदरम्यान निवडणुकीस इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 18 नोव्हेंबर रोजी वैध उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अवैध ठरवण्यात आलेल्यांपैकी काहींनी न्यायालयात धाव घेतली. जिल्हा न्यायाधीशांनी अपील निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. 23 नोव्हेंबरला निवडणूक रिंगणातील उमेदवार घोषित करण्यात आले.