आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तेसाठी भारिप-बमसंचे ‘महायुती’ला आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा परिषदेत भारिप बहुजन महासंघाची सत्ता स्थापन होत असल्याचे चित्र दिसत असतानाच सोमवारी महायुती स्थापन होणार असल्याची वार्ता राजकीय वतरुळात सुरू होती. जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी भारिप बहुजन महासंघाने भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांच्या युतीला आव्हान दिले आहे.
या बदलाने जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘एससी’ (अनुसूचित जाती) या प्रवर्गातील उमेदवाराकडे आले आहे. निवडणूक निकालाच्या दिवसापासूनच जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंचाच झेंडा फडकेल, असे चित्र दिसत होते. कारण निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाने सर्वाधिक 22 जागा मिळवलेल्या आहेत. भाजपला 11, तर शिवसेनेला आठ जागा मिळाल्या. काँग्रेसला पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागांवर धन्यता मानावी लागली, यामध्ये पाच अपक्षांनी बाजी मारली आहे. निवडणूक निकालाचे चित्र लक्षात घेता कोणत्याही पक्षाकडे सत्तेसाठी पुरेसे संख्याबळ दिसत नसले तरी, भारिप बहुजन महासंघाला सत्ता काबीज करताना काँग्रेस व अपक्षांची साथ घ्यावी लागणार होती. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी भारिप बहुजन महासंघासोबत राहत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यांची ही खुली चर्चा फोल ठरणार आहे, असे संकेत आहेत.कारण सोमवारी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आम्हाला पद नाही मिळाले तरी चालेल. पण, जिल्हा परिषदेत कोणत्याही परिस्थितीत भारिप-बमसंची सत्ता येऊ द्यायची नाही, असा अट्टहास धरला आहे. आज दिवसभर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष अशा महायुतीसाठी मोर्चेबांधणी सुरू होती.
असे असेल सत्तेचे समीकरण
असे आहे पक्षीय बलाबल
भारिप-बमसं 22, भाजप 11, शिवसेना 08, काँग्रेस 05, राष्ट्रवादी 02 व अपक्ष 05 अशाप्रकारे निवडणूक निकालानंतर पक्षीय बलाबल दिसत होते. मात्र, महायुती स्थापन होण्याच्या प्रकियेमुळे भारिपला धक्का बसला आहे. कॉग्रेसच्या भुमिकेमुले भारिप एकटा पडला आहे. त्यामुळे सर्वाधिक जागा मिळालेल्या असूनही सत्ता स्थापनेसाठी कसरत करावी लागत आहे.
अध्यक्षपद : राष्ट्रवादीकडे
उपाध्यक्षपद : काँग्रेसकडे
सभापतीपद : भाजप, शिवसेना, अपक्षांकडे
महायुतीचे नेतृत्व भाजपकडे
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाविरोधात भाजप नेतृत्व करत आहे. सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांना घेऊन महायुती स्थापन केली जात आहे. या महायुती स्थापनेमुळे जिल्हा परिषदेचे सत्तेचे एकंदरीत गणितच बदलणार असल्याचे चित्र आहे. खासदार संजय धोत्रे यांनी जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत.