आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन सदस्य देणार जुन्याच ठरावांना मंजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक गुरुवारी आयोजित केली आहे. स्थायी समितीच्या या बैठकीत नवनिर्वाचित सदस्य मागील बैठकीत झालेल्या जुन्या ठरावांना मंजुरी देणार आहेत.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष पुष्पाताई इंगळे व उपाध्यक्ष सुभाष रौंदळे यांच्या कार्यकाळात 18 डिसेंबरला स्थायी समितीची सभा घेण्यात आली होती. या सभेत जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले होते. सद्य:स्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य कार्यरत झाल्याने आता 18 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील चर्चा व घेतलेल्या ठरावांना जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या उपस्थितीत सदस्य चर्चा करून मंजुरी देणार आहे.

या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, उपाध्यक्ष देशमुख गुलाम हुसेन गुलाम नबी यांच्यासह समाजकल्याण सभापतीपदी गोदावरी जाधव, महिला व बालकल्याण सभापतीपदी द्रौपदाबाई वाहोकार, विषय समिती सभापतीपदी राधिका पाटील व रामदास मालवे यांची उपस्थिती राहील. त्यामुळे जुन्या ठरावांना मंजुरी देण्याची जबाबदारी या नवीन पदाधिकार्‍यांवर आली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

28 ला सर्वसाधारण सभा
जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित झाली असून, 28 जानेवारीला दुसरी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या सभेत 21 डिसेंबर 2013 ला झालेल्या इतिवृत्ताचे वाचन व त्यास मंजुरी देण्याची जबाबदारी या सदस्यांवर आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 78 नुसार स्थायी समिती विषय समित्यांच्या नेमणुका करणे, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 83 अन्वये समित्यांचा प्रभार निवडून आलेल्या उपाध्यक्षांकडे आणि नियुक्त झालेल्या उर्वरित दोन सभापतींकडे सोपवणे, विषय समितीपदी उर्वरित दोन सदस्यांची निवड करणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत.