आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोटमध्ये "त्या' माकडाचा धुमाकूळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(माकडाने चावा घेतल्यानंतर उपचार घेत असलेला मो. इरफान आकबानी)
अकोट- मागील २० दिवसांपासून पिसाळलेल्या माकडाने अकोटकरांना हैराण केले असून, २७ मे रोजीसुद्धा एका जणाला चावा घेतल्याची घटना घडली आहे. या माकडाच्या उच्छादामुळे नागरिक भयभीत असून, या माकडाचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, अकोला येथील वन विभागाचे एक पथकही या माकडाला पकडण्यासाठी येथे आले होते. मात्र, त्याला पकडण्यात या पथकाला अपयश आले. परिणामी, माकडाचा पुन्हा एकदा उच्छाद सुरू झाला आहे.
बुधवारी सायंकाळी वाजताच्या सुमारास शिवाजी चौकाजवळ मो. इर्फान आकबानी या व्यक्तीवर माकडाने हल्ला करून त्याच्या हाताला चावा घेतल्याची घटना घडली. इर्फानला नागरिकांनी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. शहरातील सर्वच गजबजलेल्या भागात हे माकड धुमाकूळ घालत असून, नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला. या माकडाने आतापर्यंत अनेकांना चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
परिसर बदलला
यापूर्वीया माकडाची दहशत इंदिरानगर, राजेंद्र प्लॉट, सिंधी कॅम्प परिसरात होती. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणेच टाळले होते. मात्र, आता या माकडाने आपला मोर्चा शिवाजी चौकाकडे वळवला आहे.
बातम्या आणखी आहेत...