आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • All BJP Leaders Come Together For The Akola Municipal Corporation Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला महापालिका निवडणूकीसाठीभाजप नेत्यांचे लवकरच मनोमिलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - महापालिका निवडणुकीत भाजपने उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक लढवणार्‍या नगरसेवकांचे व माजी नगरसेवकांचे मनोमिलन पक्ष लवकरच करणार आहे. यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर, संजय धोत्रे, गोवर्धन शर्मा, डॉ. रणजित पाटील यांचा एकत्रित वेळ घेत हे मनोमिलन होणार आहे. नव्याने पाच रुपयांची पावती फाडत सदस्य झालेल्या पण, जुन्या नेत्यांच्या नेतृत्वात हा प्रवेश नसेल, असे काहींनी ठणकावून सांगितले. पक्षाने आम्हाला निष्कासित केले नव्हते, त्यामुळे आम्ही पक्षातच होतो पण, पक्ष कार्यापासून थोडे दूर होतो. ज्यांचा पक्षात नव्याने प्रवेश झाला आहे त्यांच्या नेतृत्वात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही, असे नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर एका भाजप नेत्याने स्पष्ट केले.


जुने-नवे एकत्र येणार
भारतीय जनता पक्षाचे आम्ही निष्ठावान कार्यकर्ते आहोत. त्यामुळे पुन्हा पक्षात प्रवेश हा विषयच नाही. येत्या काही दिवसात जुन्या व नव्या कार्यकर्त्यांसह मनोमिलन करण्याचा आमचा मनोदय आहे. योग्य वेळ आल्यावर ते होईल, पक्षाच्या नियमानुसार तूर्तास यावर अधिक भाष्य करणे टाळलेलेच बरे.’’ पवन पाडिया,माजी ज्येष्ठ नगरसेवक भाजप.


जिल्हय़ातील नेत्यांचे कधी होणार एकत्रिकरण ?
शहरातील आजी-माजी पदाधिकार्‍यांचे मनोमिलन होत असताना जिल्हय़ातील काही भाजप नेत्यांचे मनोमिलन कधी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्हास्तरावर अनेकांचे मनोमिलन व्हावयाचे आहे. त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात कधी जोडणार व योग्य जबाबदारी कधी देणार, असा प्रश्न जुने जाणते कार्यकर्ते विचारत आहेत.


पक्षात व्यक्तीपूजा अमान्य, तरीही चरण वंदन सुरूच
व्यक्तीपूजेला भाजपमध्ये काहीच स्थान नाही, असे म्हणतात. नुकत्याच एका घरगुती कार्यक्रमात एका भाजप सदस्याने पक्षातील स्थानिक नेत्याचे चरण वंदन केले. या चरण वंदनावरून मोठे महाभारत येथे रंगले. व्यक्ती पूजनाला पक्षात बंदी असताना अशा प्रकारे कुणाचे चरण वंदन करू नये, अशी समज या सदस्याला देण्यात आली. भविष्यात अशा चुका टाळा, असा सज्जड दम देण्यात आल्याची माहिती मिळाली.