आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचे गूढ कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करायची की स्वबळावर लढायचे, याविषयी अँड. प्रकाश आंबेडकर 5 मार्चला भूमिका जाहीर करणार होते. मात्र, त्यांनी याबाबत गूढ कायम ठेवले आहे. त्यामुळे काँग्रेससह इतर राजकीय पक्षांचे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष केंद्रित झाले आहे. भाजप नेत्यांनीदेखील त्यांच्या भूमिकेविषयी चाचपणी केल्याने त्यांच्या भूमिकेबाबत विरोधक किती उत्सुक आहेत, याची प्रचिती आली. भारिप-बमसं व काँग्रेस यांच्यातील आघाडीची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेला 5 मार्च रोजी पूर्णविराम देऊ, अशी माहिती अँड. आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. 5 मार्चला ही भूमिका घोषित होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यांची भूमिका गुलदस्त्यात राहिल्याने काँग्रेस गोटात अस्वस्थता, तर भाजप नेत्यांना याबद्दल चिंता होती. दिल्लीत असलेल्या अँड. आंबेडकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.