आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेडिकल बिलांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागात ‘कमिशनराज’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांच्या मंजुरीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाचे काही कर्मचारी पैशांची मागणी करत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांचे हे ‘कमिशनराज’ वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे,’ अशी माहिती काही कर्मचार्‍यांनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर दिली. दरम्यान, याविषयी संबंधित कर्मचार्‍याशी संपर्क केला असता त्यांनी ‘मजुरी’ घेत असल्याचे मान्य केले.

महापालिका कर्मचारी किंवा त्यांच्या परिवारातील एखाद्या व्यक्तीची वैद्यकीय अडचणीतून सुटका झाल्यानंतर संबंधित कर्मचार्‍याला कमिशनचा त्रास सहन करावा लागतो. तीन-तीन महिने वेतन नसताना होणारी ही अडचण गंभीर आहे. वेतन नसल्याने कमिशन देण्यासाठीही पैसे नसल्याची ओरड काही कर्मचार्‍यांकडून केली जात आहे. मोठय़ा आजारात रुग्णालयातील खर्च व औषधांचा मोठा खर्च होतो. त्यानंतर वैद्यकीय देयक जमा करणे, डॉक्टरांच्या चिठ्ठय़ा सांभाळणे, वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आवश्यक असलेला अर्ज भरणे असे सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय विभागाकडे ते द्यावे लागतात. त्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येते.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिक किरण शिरसाट वैद्यकीय क्षेत्राशी निगडित नसल्याने ते या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांची तपासणी करत नाहीत. या विभागातील औषध निर्माता र्शीकृष्ण कोथळकर हे सर्व अर्जांची तपासणी करतात. ही तपासणी करण्यासाठी महापालिकेच्या किसनीबाई भरतिया रुग्णालयातील श्रीकृष्ण कोथळकर हे पैशांची मागणी करत आहे, असा आरोप काही कर्मचार्‍यांनी केला आहे.

या विषयाची त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी श्रीकृष्ण कोथळकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी हे देयक तयार करण्यासाठी शंभर, दोनशे रुपये मजुरी घेत असल्याची बाब भ्रमणध्वनीवर मान्य केली. कर्मचार्‍यांची देयके थांबवली की ते आरोप करतात, असेही त्यांनी सांगितले. या विभागात मोठय़ा प्रमाणात ‘कमिशनराज’ सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकारामुळे कर्मचार्‍यांची मात्र पिळवणूक होत आहे.