आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शवविच्छेदनानंतर मृत जनावरे उघड्यावर पडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरालगत असलेल्या शिवणी, शिवर तसेच परिसरात पावसात भिजल्याने आजारी झालेली 42 जनावरे दगावल्याची घटना 24 जुलै रोजी घडली होती. शवविच्छेदनानंतर मृत जनावरांची विल्हेवाट न लावता परिसरातच उघड्यावर टाकून दिले आहे. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कोणीच घेताना दिसत नाही. परिसरात दुर्गंधी पसरली असून, ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

शहरालगत असलेल्या शिवणी, शिवर, कुंभारी परिसरात काठेवाडी लोकांची जनावरे गुरुवारी पावसात भिजल्याने मृत्युमुखी पडली. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकार्‍यांनी त्वरित महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी जनावरांच्या मृत्यूचे कारण तपासण्यासाठी परिसरातच मृत जनावरांचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर मृत जनावरे तशीच उघड्यावर टाकून दिली असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

आणखी आठ जनावरांचा मृत्यू
पावसात भिजल्याने लागोपाठ 42 जनावरे मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी घडली. यातील बर्‍याच आजारी जनावरांवर उपचारदेखील करण्यात आले होते. मात्र, शुक्रवार 25 जुलै रोजी कुंभारी येथील तीन, बोरगाव मंजू येथील दोन, सिसा मासा दोन, बाभुळगाव येथील एक अशा आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे.