आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णासाहेबांच्या प्रेरणाशिल्पाचे अनावरण पवारांच्या हस्ते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी (कै.) वा. रा. उर्फ अण्णासाहेब कोरपे यांच्या पूर्णाकृती प्रेरणाशिल्पाचा अनावरण सोहळा बँकेच्या आवारात 21 ऑक्टोबरला होणार आहे. या प्रसंगी कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, वनमंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री राजेंद्र दर्डा यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे संबोधित करणार आहेत. या मेळाव्याला जिल्हय़ातील शेतकरी बांधवांनी क्रिकेट क्लबवर बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष, मेळाव्याचे आयोजक डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी केले आहे.