आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटी गुंडा स्कॉडला दुसऱ्यांदा केले बरखास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तीन महिन्यांपूर्वी अँटी गुंडा स्कॉडच्या पथकावर देवघेवीचा आरोप झाला होता. त्या धर्तीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तडकाफडकी अँटी गुंडा स्कॉड बरखास्त केले होते. पुन्हा हे स्कॉड शुक्रवारी पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी बरखास्त केले आहे.

शहर पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वामध्ये अँटी गुंडा स्कॉड कार्यरत आहे. गत आठवड्यात या स्कॉडच्या कारवाया वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या लेखी वादग्रस्त ठरल्याची माहिती आहे. १५ दिवसांपूर्वी एमआयडीसीतून काळ्या बाजारात जाणारे तांदळाचे दोन ट्रक अँटी गुंडा स्कॉडच्या पथकाने पकडले होते.

ही कारवाई पुरवठा विभागाने करणे अपेक्षित असताना ती अँटी गुंडा स्कॉडच्या पथकाने केल्यामुळे पुरवठा विभागाची नाराजी स्कॉडला भारी पडली. तसेच या प्रकरणात तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्याला अँटी गुंडा स्कॉडच्या पथकाने भीक घातली नव्हती. तसेच पोलिस अधिकारी पुत्राच्या बीअर बारवर टाकलेला छापा ग्रामीण भागात केलेल्या कारवायांमुळे अँटी गुंडा स्कॉडच्या विरोधात तक्रारी गेल्याची माहिती आहे. त्या माहितीच्या आधारे हे स्कॉड बरखास्त केल्याची चर्चा शहरात आहे.

नवीन लोकांना संधी देण्यासाठी स्‍कॉड निष्प्रभ
-नवीनलोकांना संधी देण्यासाठी अँटीगुंडास्कॉड निष्प्रभ केला आहे. त्याला बरखास्त म्हणता येणार नाही. नवीन लोकांना संधी देण्यासाठी बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी तूर्तास बदल केला. लवकर स्कॉड कार्यान्वित होणार आहे.'' डॉ.प्रवीण मुंढे, शहर पोलिस अधीक्षक