आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटी गुंडा स्कॉडचा खदान येथे छापा, दोघांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरपोलस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या नेतृत्वातील अँटी गुंडा स्कॉडने सोमवारी खदान परिसरातून अवैधपणे देशी दारूची वाहतूक करताना दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून १४४ देशी दारूचे क्वार्टर आणि दुचाकी जप्त करण्यात आली.
विनापरवाना देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती अँटी गुंडा स्कॉडला िमळाली. त्यावरून खदान परिसरातून दुचाकीवरून दारूच्या तीन पेट्या घेऊन जात असताना शांतीनगर येथील सुरेश वानखडे वय २४ आणि खडकी येथील कैलास गोपनारायण वय २२ या दोघांना पोिलसांनी पकडले. त्यांना अटक केली असून, पोलिसात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अँटी गुंडा स्कॉडचे शक्ती कांबळे, कुणाल सोनोने, दीपक मोदीराज आणि सुनील नागे यांनी केली आहे. अँटी गुंडा स्कॉडच्या कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खदान परिसरातून अवैधपणे हाेणारी देशी दारूची वाहतूक अँटी गुंडा स्कॉडने पकडली.