आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आपला प्रयास’तर्फे शहराचा विकास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - ‘आपला प्रयास’ या संघटनेतर्फे शहर विकासास हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी 14 ऑक्टोबरला आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

कधीकाळी स्वच्छ, सुंदर आणि उद्यानाचे शहर म्हणून अकोल्याची ख्याती होती. परंतु, सध्या शहर समस्यांचे माहेरघरच झाले आहे. सर्वत्र साचलेली घाण, कचरा, खड्डेमय रस्ते, वाढत्या धुळीमुळे होणारी रोगराई ही चिंतेची बाब आहे. ज्या शहरात आपण वाढलो, त्या शहराच्या विकासासाठी हातभार लावू शकतो. याची जाणीव ठेवून ‘आपला प्रयास’ ही सामाजिक संघटना उभारली आहे.

या संघटनेत डॉक्टर, वकील, शिक्षण संस्था चालक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिक सहभागी झाले आहेत. संघटनेतर्फे शहरातील समस्यांबाबत जनजागृतीचे कार्य सुरू आहे. या उपक्रमासाठी डॉ. श्रीकांत मालपाणी, डॉ. दीपक केळकर, डॉ. वाघेला, डॉ. वंदना जोशी, डॉ. एस. एम. अग्रवाल, नीता अग्रवाल, डॉ. प्रशांत अग्रवाल, डॉ. ममता अग्रवाल, डॉ. संदीप अरसड, डॉ. पराग टापरे, रोहित सराफ, विवेक मंत्री, अँड. देवेंद्र अग्रवाल, रूपेश जयस्वाल, सारिका जयस्वाल, सुनीता अग्रवाल, राहुल देशमुख, डॉ. सुनीता लढ्ढा, डॉ. महेश गांधी, सुभाष केळकर, डॉ. अतुल महाशब्दे, सुधीर इंगळे, दिलीप पाटील कार्यरत आहेत.

काय करायला हवे
घरातील, व्यापारी गाळ्यासह दुकानातील कचरा घंटागाडीत किंवा कचराकुंडीत टाकणे ही दक्षता प्रत्येकाने घ्यावी. कॅरिबॅग, डिस्पोझेबल वस्तूंचा वापर टाळावा. जनसहभागाशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने चळवळीला सहकार्य करावे.