आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्हेगारी कारवायांवर सामान्यांचा राहील ‘अॅप’द्वारे वचक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - डोळ्यांदेखतएखादी घटना घडत असेल, दारू विकल्या जात असेल, वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसेल, तर अशा वेळी मोबाइलमध्ये फोटो काढा, त्याविषयी चार ओळी लिहा अन् मला व्हॉट्सअॅपवर किंवा चिठ्ठीद्वारे पाठवा, तोच पुरावा ग्राह्य धरून पोलिस घटनेचा तपास करतील, हा उपक्रम आपण लवकरच सुरू करणार आहोत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी दिली. शुक्रवारी "दिव्य मराठी'च्या कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान ते बोलत होते.
गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी आपण एक अॅप तयार करण्याचे ठरवले आहे. यावर माहिती सांगणा-यांची ओळख गुप्त ठेवल्या जाईल. यातून गुन्हेगारांवर जरब बसवण्याचा प्रयत्न आहे, असे चंद्र किशोर मीणा म्हणाले.

महाराष्ट्राचेपोलिस सर्वांत चांगले : इतरराज्याच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांचे काम चांगले आहे. येथील पोलिस हे सकारात्मक आहेत. इतर राज्यांच्या एसपींना भेटणे अवघड आहे. आपल्याकडे तसे नाही, पोलिसांची भूमिकाही चांगली आहे, असे ते म्हणाले.

युथ अवेअरनेस कॅम्प
आपल्याहातून घडलेल्या बाबी ह्या एखादा गुन्हा असू शकतो, याबाबत युवकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे त्यांच्या हातून अनेक गुन्हे कळत कळत घडत असतात. असे होऊ नये, यासाठी आपण युथ अवेअरनेस कॅम्प घेणार आहोत. या कॅम्पमध्ये महाविद्यालयीन युवकांना सहभागी करण्यात येणार आहे.

प्ले-स्कूल, पाळणाघर
पोलिसांनाकुठल्या अवस्थेत काम करावे लागते, हे त्यांनाच माहीत असते. त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या तर कामाचा रिझल्ट चांगला येतो. त्यामुळे आपण पोलिसांच्या मुलांसाठी प्ले-स्कूल पाळणाघराची उभारणी करणार आहोत. पोलिस वेल्फेअर निधीमधून हे लवकरच करणार आहोत.

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ
सायबरगुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच महिलांवरील गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यावर वचक निर्माण करण्यासाठी प्रथमच महिला बिट मार्शल महिला पेट्रोलिंग व्हॅन सुरू केली आहे. या दोन्ही बाबींवर पोलिसांचे लक्ष आहे. सरकारनेसुद्धा एक हजार महिला पीएसआयची पदभरती करण्याचे ठरवले आहे.