आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपोतीकर हल्ला; आरोपी ताब्यात, २८ मेपर्यंत दोघांना पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- देशमुख फैल येथील सागर आपोतीकर याच्यावर हल्ला करणारे तीन आरोपी रामदासपेठ पोलिसांनी गजाआड केले आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असून, हल्लेखोरांच्या भावाचे खून प्रकरण मिटवण्यासाठी हल्ला घडवून आणल्याची माहिती आहे, तर सागर आपोतीकर याच्यावर शस्रक्रिया करण्यात आली असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
सागर आपोतीकर या युवकावर शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आला. सागर याला जीवाने ठार मारण्याच्या उद्देशाने आणि सागरचा भाऊ युवराज आपोतीकर याच्या खुनाचे प्रकरण मिटवण्याच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याची तक्रार सागर याचे काका दीपक विश्वनाथ आपोतीकर यांनी रामदासपेठ पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी सागर बुंदेले, सोनू कासव, विकी किशोर गोसर या तिघांविरुद्ध भादंवि ३०७, ३२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी सकाळी सोनू कासव आणि विकी गोसर याला अटक केली, तर सायंकाळी सागर बुंदेले याला पोलिसांनी अटक केली आहे. सोनू कासव आणि विकी गोसर या दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, तर सागर बुंदेले याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक जगताप यांनी दिली आहे.
पाठोपाठ तीन हल्ले
देशमुख फैल आणि विजयनगर येथील युवकांमधून विस्तव जात नाही, अशी परिस्थिती गेल्या सहा महिन्यांपासून झाली आहे. नोव्हेंबरमध्ये सागर आपोतीकर याचा लहान भाऊ युवराज आपोतीकरवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. त्यातील सर्व आरोपी हे कारागृहात आहेत. त्यानंतर दोन महिन्यांनी देशमुखफैल येथीलच आनंद गहले नावाच्या युवकावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यानंतर हा तिसरा हल्ला करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...