आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यातील मोकाट आरोपींना फरार घोषित करण्याच्या हालचाली सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - आर्यरूप टुरिझम अँण्ड क्लब रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील घोटाळ्यातील मोकाट आरोपींना फरार घोषित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. अकोल्यातील नारायण नथ्थुजी ढवळे यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून कंपनीचे रवींद्रकुमार देशमुख, वसुधा देशमुख, राजेश पालीवाल, राजकुमार पांडे, नितीन गुप्ते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला गेला. सीआयडीने गुप्तेला अटक केली. उर्वरित आरोपींपर्यंत पोहोचण्यात सीआयडीला अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे आता या आरोपींना फरार घोषित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सीआयडीतर्फे चौकशी
पर्यटन व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली कंपनीने राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधीने गंडवले होते. या प्रकरणाचा तपास करण्याकरिता पोलिस महासंचालकांच्या आदेशाने विशेष पथक गठित करण्यात आले आहे. हे पथक सीआयडीला तपासात मदत करत आहे.


अशी केली फसवणूक..
आर्यरूप टुरिझम अँण्ड क्लब रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी गुंतवणूकदारांशी ऑनलाइन व्यवहार करायची. टीम लिडरची संगणकावर पॅकेज समजावून सांगण्याची पद्धत, पाठपुरावा, आकर्षक कमिशनमुळे गुंतवणूकदारही कंपनीकडे आकृष्ट होत असे. गुंतवणूकदारांचा आयडी कंपनीला माहीत असायचा. कंपनी सुरुवातीला पारदर्शक कारभाराचा देखावा करत गुंतवणूकदाराच्या खात्यावर पॉइंट्सही जमा करत असे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कंपनीवर विश्वास बसायचा. मात्र, कमिशन गुंतवणूकदाराच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात येत नव्हते तसेच कंपनीतर्फे गुंतवणूकदाराला मूळ रक्कमही परत करण्यात येत नव्हती. कंपनीचे ‘रूप’ समजल्यानंतर फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात येत होते. मात्र, तोपर्यंत वेळ गेलेली असायची. दरम्यान या प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ठाणे जिल्ह्यातील मुरबाडी येथील जमीनही जप्त केली आहे.