आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Artificial Breathing,Latest News In Divya Marathi

प्रशिक्षणार्थींनी गिरवले कृत्रिम श्वासोच्छवासाचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीची अलीकडच्या काळात संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली असून, आपत्तीप्रसंगी प्रत्येकास त्यातून बचावाचे तंत्र तसेच इतरांचा जीव वाचवण्याची कला अवगत असणे गरजेचे आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची कला खूप गरजेची असून, त्याबाबत 12 जून रोजी प्रशिक्षणार्थींकडून शास्त्रशुद्ध मार्गदर्शन, प्रात्यक्षिक व सराव करवून घेण्यात आला.
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने हॉटेल वेलकम इनमध्ये 11 ते 14 जूनदरम्यान आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराच्या दुसर्‍या दिवशी हाड मोडणे, भाजणे आदींसह इतर आपत्तींबाबत मार्गदर्शन झाले. आजच्या सत्रात सर्वप्रथम स्वप्निल बढे यांनी कृत्रिम श्वासोच्छवास, सर्पदंश तसेच श्वास नलिकेत किंवा गळ्यात एखादी वस्तू अडकल्यास आपद्ग्रस्तास कशी मदत करावी, याचे तंत्र शिकवले.
त्यासोबतच आगीने भाजणे व त्याचे योग्य व्यवस्थापन यावरही तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. पाण्यात बुडणे, श्वास नलिकेत एखादी वस्तू अडकणे, विजेचा झटका लागणे, विषबाधा होणे, सर्पदंश, श्वानदंश, मधमाश्यांचा हल्ला, विंचू चावणे आदींसारख्या आपत्तींमध्ये कुठली काळजी घ्यावी? घटना घडल्यानंतर नेमके काय करावे? यावर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिकासह शिबिरार्थींकडून सराव करून घेण्यात आला. शिबिरार्थींना आजच्या सत्रात डॉ. रजत मालोकार, प्रियेश शर्मा, ‘अजिंक्य’चे धनंजय भगत आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शिबिरात अकोला, अमरावती, धुळे, जळगाव, नागपूर येथील 35 प्रशिक्षणार्थींचा समावेश असून, रेडक्रॉसचे मानद् सचिव प्रभजितसिंह बछेर, अली अकबर खामोशी, प्रशांत राठी, जितेंद्र सोनटक्के, अँड. महेंद्र साहू, मोहन काजळे, मनोहर हरणे आदींसह रेडक्रॉसचे पदाधिकारी पुढाकार घेत आहेत. मुंबईचे राज्य समन्वयक तेजल देशपांडे, अँड. एस. एस. ठाकूर, राज्य समन्वयक भगत जोईल यांचेही सहकार्य लाभत आहे.