अकोला-
आपल्याबहारदार अभिनयाने चित्रपट सृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारी मराठी चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकर 30 सप्टेंबर रोजी अकोल्यात येत आहे. गोरक्षणरोड येथील व्ही.एच.बी कॉलनीतील नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने मागील 14 वर्षांपासून दुर्गा उत्सव गरबा रास उत्सव आयोजित केला जातो. या ठिकाणी मंगळवार 30सप्टेंबर रोजी सांयकाळी 7.30 वाजता मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर अकोलेकरांसोबत गरबा खेळणार आहे, अशी माहिती नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली.