आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेल महोत्सवात- अश्विनी, धनंजय, संजू यांनी मारली बाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला -राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र पश्चिम विदर्भ शाखा, अमरावती विभागीय शाखेतर्फे आयोजित ब्रेल महोत्सवाचा 18 जानेवारीला बक्षीस वितरणाने समारोप झाला. 17 जानेवारीला झालेल्या विविध स्पर्धांमध्ये अश्विनी शेजव, धनंजय लोटे, संजू उमरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त खंडेलवाल भवन येथे महोत्सव आयोजित केला होता.

महोत्सवात झालेल्या ब्रेल वाचन स्पर्धेत अश्विनी शेजव प्रथम, सुरेश ठाकूर द्वितीय, तर रूपेश हिरुळकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. ब्रेल लेखन स्पर्धेत प्रथम अश्विनी शेजव, द्वितीय विपुल चांदेकर, तर तृतीय सुरेश ठाकूर, सुगम गीत गायन स्पर्धेत धनंजय लोटे प्रथम, लक्ष्मी वाघ द्वितीय, संदीप इंगळे व सुधीर इंगळे तृतीय, बुद्धिबळ स्पर्धेत संजू उमरकर प्रथम, मनोज पडोळे द्वितीय, तर र्शीराम झारेकर व नीलेश राठोड तृतीय क्रमांकाने विजयी झाले. विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

समारोप कार्यक्रमात मनपा उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाणे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार, शरद वानखडे, डॉ. उद्धव सोनोने यांनी मार्गदर्शन केले. मारवाडी युवा मंचतर्फे सर्व महिलांना साडी देण्यात आली. अकोला अर्बन बँकेने पांढर्‍या काठीचे वाटप केले. संतोष खंडेलवाल यांच्यातर्फे जेवणाची सोय करण्यात आली. दोनदिवसीय महोत्सवाला एम. वाय. गुरव, रामविजय जाधव, विजय सुटे, शालिनी मुंदडा, अमरावती विभागीय अध्यक्ष सुरेश मुंदडा, रवींद्र यादव, उपाध्यक्ष संतोष मोरे, सचिव मनोज गुल्हाणे, गोपाल वाघमारे, संदीप गुल्हाणे, सचिन बनसोड, श्याम गुल्हाणे यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य आणि जवळपास 175 युवक, युवती उपस्थित होते.