आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Constituency,latest News In Divya Marathi

मतविभाजन भारिप, भाजपच्या पथ्यावर, शिवसेनेसमोर जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- भारतीयजनता पार्टी आणि भारिप बहुजन महासंघ या पक्षाची जिल्ह्यात मुख्यत्वे व्होट बँक असलेले पक्ष म्हणून चर्चा होते. या पक्षाचा मतदार हा ठरलेला आहे. मात्र, पहिल्यांदाच प्रत्येक पक्षात उमेदवारांची भाऊगर्दी असल्याने पुन्हा या निवडणुकीमध्ये मतविभाजनाचा फायदा भारिप-बमसं आणि भाजपला होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. अशातच िशवसेनेसमोर जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे तसेच यंदा बाहेरून आलेल्यांच्या भरवशावर का होईना, राष्ट्रवादीसुद्धा एखाद्या जागेवर आपला हक्क दाखवण्याची शक्यता पहिल्यांदाच िनर्माण झाली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर परिषदांवरील वर्चस्व लक्षात घेता, भारिप-बहुजन महासंघ आणि भाजपची जिल्ह्यात चांगली ताकद आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा भाजपने जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांवर आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना त्या मतांचा फायदा होणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, तर भािरप बहुजन महासंघ हा पक्ष नेहमीच एकला चलो रे त्या भूिमकेमध्ये असल्यामुळे इतर पक्षांच्या उमेदवारांमधील मतविभाजनाचा फायदा भारिपच्या उमेदवारांना होऊ शकतो. गेल्या िनवडणुकीमध्ये युती, आघाडी असल्यामुळे त्या पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार होता. मात्र, या वेळी प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र उमेदवार असल्यामुळे त्यांच्यात मतांची विभागणी निश्चित आहे, तर भािरप गेल्या निवडणुकीतही कोणाच्याही सोबत नसल्यामुळे त्यांच्या मतांची विभागणी होणार नसून, यंदा त्यांची व्होट बँक शाबूत अाहे तसेच भाजपची लाट असल्यामुळे त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचे चित्र आहे.
भारिपच्या नेत्यांना मानवत नाही लाल दिवा
मोठ्यापदापर्यंत चळवळीचा कार्यकर्ता म्हणून जायचे आणि एकदा पद मिळाले की, त्यांचा हव्यास वाढतो, याचे उदाहरण भारिप-बमसं या पक्षामध्ये आहे. या पक्षाने मोठे केलेले आणि लाल दिवा दिलेले बहुतांश नेत्यांनी परंपरागत व्होट बँकेला धक्का देत वेगळी चूल मांडली आहे. श्रावण इंगळे झेडपीचेे अध्यक्ष झाले होते. नंतर त्यांनी पक्षाला जयभीम केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा पुष्पा इंगळे यांनीसुद्धा तोच िकत्ता गिरवत बंडखाेरी केली. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या जि.प.च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दशरथ भांडे, मखराम पवार, रामदास बोडखे यांनासुद्धा लाल दिवा मिळाल्यानंतर त्यांनी पक्षाला कायमची सोडचिठ्ठी दिली होती.
उमेदवारी नाकारलेल्यांचे उमेदवारापुढे आव्हान
पक्षातूनउमेदवारी नाकारण्यात आलेल्यांनी विद्यमान आमदारांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यात अकोला पश्चिममधून राष्ट्रवादीत आलेले विजय देशमुख यांचे विकासाच्या मुद्द्यावर प्रस्थापितांसमोर आव्हान आहे. मूर्तिजापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार यांनी पक्षात बंडखोरी करत पक्षाच्या उमेदवाराच्या नाकीनऊ आणले आहे, तर बाळापूर मतदारसंघात शिवसंग्रामचे संदीप पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार करत आपल्या जाहिरातींवर भाजप नेत्यांचे फोटो वापरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे, तर अकोला पूर्वत भारिपच्या बंडखोर उमेदवार पुष्पा इंगळे यांनी हरिदास भदेंच्या मतांला सुरुंग लावण्यासाठी उमेदवारी कायम ठेवली आहे.