आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सीएम मॅडमचे सीक्रेट मिशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘सात जन्मांसाठी हाच पती मिळो..’ अशी मनोकामना वटपौर्णिमेच्या दिवशी पतीव्रता करतात. ही मनोकामना पूर्ण व्हावी व पती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळावे, यासाठी गुरुवारी सत्त्वशीला चव्हाण सीक्रेट मिशनवर अकोल्यात आल्या होत्या.
हॉटेल जसनागरा येथे झालेल्या गुप्त बैठकीत त्यांनी काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागा, असा संदेशही दिला.काँग्रेसच्या काही निवडक कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी थेट सत्त्वशीला चव्हाण यांनी पुढाकार घेतला. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, भाजपचा खोटा प्रचार जनतेसमोर आणा, आपले काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करा, शिस्तबद्ध पद्धतीने संघटन मजबूत करा, असा मौलिक संदेशही त्यांनी दिला. या वेळी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र फोटोग्राफर, टीम त्यांच्यासोबत होती. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमापासून काँग्रेसच्या ज्येष्ठांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. युथ काँग्रेस, सेवादल, महिला काँग्रेसचे निवडक कार्यकर्ते व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. स्टेजवर सत्त्वशीला चव्हाण, काँग्रेसचे महासचिव राजेश भारती, मो.ब्रदुजमा आणि शहर अध्यक्ष मदन भरगड यांची उपस्थिती होती. वाशीम जिल्हय़ातून आलेल्या कार्यकर्त्यांनी माजी खासदार अनंतराव देशमुख यांना जबाबदारीचे पद देण्याची मागणी केली.