अकोला- अकोलापूर्व अकोला पश्चिम मतदारसंघांतील मतदान केंद्राधिका-यांनी ईव्हीएम मशीन ताब्यात घेतल्या. मतदान केंद्राधिकारी चमूसह प्रत्येकाला नेमून दिलेल्या मतदार केंद्रावर मंगळवारी दुपारी रवाना झाले. अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्राधिका-यांना इतर साहाय्यकारी कर्मचाऱ्यांना वसंत देसाई स्टेडियमवर साहित्याचे वाटप करण्यात आले, तर अकोला पश्चिम मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना शासकीय धान्य गोदाम, खदान येथून साहित्याचे वाटप करण्यात आले. अकोला पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे पश्चिमचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या मार्गदर्शनात सर्व मतदान कर्मचाऱ्यांना साहित्याचे वाटप झाले. सकाळी वाजेपासून तर दुपारी वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. या प्रकियेसाठी तहसीलदार संतोष िशंदे, तहसीलदार राजेंद्रसिंग जाधव, नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, पूजा माटोडे, आराधना निकम यांच्या देखरेखीत ईव्हीएम सािहत्याचे वाटप चोखपणे झाले.
सर्वांनी मतदान करावे
^विधानसभेच्यानिवडणुकीत
आपण आपल्या स्थानिक लोकप्रतििनधीला निवडून देतो. आपण निवडून दिलेले लोकप्रतििनधी सामाजिक प्रश्नांचे निराकरण करतात. आपल्या विकासासाठी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी बहुसंख्येने मतदान करा. प्रा.संजय खडसे, निवडणूकनिर्णय अधिकारी.