आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही बळकट करा : प्रा.खडसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मतदानाचीटक्केवारी वाढवून लोकशाही बळकट करा, असे आवाहन अकोला पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

मतदार जनजागृती अभियानांतर्गत मंगळवारपासून जनजागृती रथ काढण्यात येत आहे. या रथाला हिरवी झेंडी दाखवून प्रा. संजय खडसे यांनी सोमवारी सुरुवात केली. निवडणूक प्रक्रिया लोकशाहीचे महत्त्वाचे अंग असून, भारतीय संविधानाने नागरिकाला बहुमूल्य अधिकार प्रदान केला आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या एका मताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.
मतदारपुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ : गेल्या२००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या अकोला पूर्व मतदारसंघात ५३.७४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर माहे एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये १० टक्क्यांनी वाढ होऊन ५७.३५ टक्के मतदान झाले. यावेळीसुद्धा गत निवडणुकीपेक्षा १० टक्क्यांनी मतदानामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येईल.

चुकता मतदान करा
१५ऑक्टोबर रोजी होणा-या निवडणुकीच्या दिवशी सकाळी ते संध्याकाळी वाजेपर्यंत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.