आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियावर स्थानिक उमेदवारासाठी जोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- आचारसंहितालागू असतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक स्थानिक उमेदवाराला उमेदवारी मिळवण्यासाठी आपापल्या ग्रुपमध्ये संदेश पाठवून प्रचार-प्रसार करत आहेत. या वेळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष भारिप बहुजन महासंघ यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
पण, जर युती झाली नाही तर चित्र वेगळेच दिसायला मिळणार आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादीचे प्रा. तुकाराम बिरकड यांनी भाजपचे रावसाहेब कांबे यांना पिछाडी देत विजय मिळवला होता, तर २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिभा अवचार भारिप-बमसंचे अॅड. बलदेव पळसपगार या पार्सल उमेदवारांना पक्षांनी उमेदवारी दिल्याने पराभवाचा सामना करावा लागला होता. स्थानिक भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे ऐतिहासिक आघाडी घेत १५ हजार ३८८ मतांनी िवजयी झाले होते. मात्र, यंदा मोदी लाटेच्या कारणास्तव युवा पिढीत एक जनजागृती आली आहे. म्हणून भविष्याचा विचार करत यंदा विधानसभेत पाठवण्यात येणारा आमदार स्थानिक असावा, यावर सोशल मीडियातून युवा पिढी जोर देताना दिसत आहे. तशा आशयाचे संदेश एकमेकांना पाठवणे सुरू आहे. मात्र, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत पार्सल उमेदवारच देतील, असे वाटत आहे. मूर्तिजापुरातून यंदा पार्सल उमेदवार निवडून येणार नाही, असे चित्र तरुणाईच्या व्हॉटसअॅप, फेसबुकवरील संदेशांवरून दिसत आहे.