आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१५ इच्छुकांनी घेतले १८० नामांकन अर्ज; मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- विधानसभा २०१४ चे चित्र लक्षात घेता उमेदवारांची संख्या निश्चित वाढणार असून, एकाच पक्षात प्रतिस्पर्धी वाढल्याने बंडखोरी होण्याच्या मार्गावर आहे. २० सप्टेंबरपासून मूर्तिजापूर विधानसभेकरिता आज २५ सप्टेंबरपर्यंत एकूण १५ इच्छुक उमेदवारांनी १८० नामांकन अर्ज घेतले आहेत. मात्र, नामांकन अर्ज अद्याप तीनच दाखल झाले आहेत.
यामध्ये दोन अपक्ष उमेदवार बळीराम इंगळे, हिरालाल उर्फ पंडित सरदार यांनी अर्ज दाखल केलेत, तर भारिप-बमसंचे कार्यकर्ते संदीप सरनाईक यांनी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीवर निवडणूक विभागाची करडी नजर असून, पेड न्यूजसह, आचारसंहितेच्या उल्लंघनावर लक्ष असल्याचे िनवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निपाणे यांनी सांगितले. मूर्तिजापूर बार्शिटाकळी तालुका मिळून विधानसभा मतदारसंघ तयार झाला असून, त्यानुसार मूर्तिजापूर तालुक्यातील १६४ गावे, बार्शिटाकळी तालुक्यातील १५९ गावे, अकोला तालुक्यातील २० गावे मिळून ३४३ गावांचा मतदारसंघात समावेश आहे. मतदानासाठी ३४२ मतदान केंद्र आहेत. मतदारांची संख्या पाहता पुरुष मतदार लाख ५२ हजार ७२३ स्त्री मतदारांची संख्या लाख ४० हजार २८० मिळून लाख ९३ हजार लोकसंख्या आहे. या विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक कामाकरिता १७५० अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. यामध्ये तीन भरारी पथक, दोन स्ट्रीक, चार व्हिडिओ चित्रीकरण पथक कार्यान्वित केले आहे. निवडणुकीची एकंदरित स्थिती पाहता सर्व पक्षात स्वबळावर लढण्याचे वारे असून, २६ २७ सप्टेंबरला अर्ज दाखल करण्यासाठी उपविभागीय कार्यालयात भाऊगर्दी होईल. उमेदवारी अर्जाची उचल करणाऱ्यांमध्ये राजकीय पक्षापेक्षा अपक्षांचा सर्वाधिक भरणा दिसून येत आहे. सध्या तरी एकाही राजकीय पक्षाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीला खरा रंग चढणार आहे. सर्व इच्छुक उमेदवार आपापल्या स्तरावर प्रचार कामात लागल्याचे चित्र आहे.