आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्ध्या दिवसातच स्वगृही परतले, अपेक्षा भंगल्या, इकडूनही गेले अन् तिकडूनही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- उमेदवारी मिळवण्याच्या नादात अनेकदा राजकीय पदाधिकारी आपले अस्तित्व धोक्यात आणतात. उमेदवारीसाठी वाट्टेल ते करण्याची तयारी राजकीय पुढाऱ्यांची असते. शिस्तबद्ध समजला जाणारा भारतीय जनता पक्षही यास अपवाद ठरलेला नाही. भाजपचे महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे पक्ष उमेदवारी देत नाही, ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या डेऱ्यात काही वेळासाठी दाखल झाले. मात्र, त्यांचा विवाह होण्याआधीच घटस्फोट झाला. दुपारी शिवसेनेच्या तंबूत गेलेले डॉ. ओळंबे सायंकाळी सुबह का भूला शाम को घर आये, या म्हणीप्रमाणे परतले.
गेल्या काही वर्षांपासून डॉ. अशोक ओळंबे भाजपत सक्रिय आहेत. गेल्या काही वर्षांपासून महानगराध्यक्षपद आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती, परंतु उमेदवारी गोवर्धन शर्मा यांनाच मिळाली. परंतु, २०१४ ची निवडणूक लढवायचीच, असा निर्णय त्यांनी घेतला होता. प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला एकदा तरी निवडणूक लढवावी, अशी इच्छा असते. पण, पक्ष उमेदवारी देताना जनसंपर्कासह निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊनच उमेदवारी देण्याचा प्रयत्न करतो. परंतु, आपली क्षमता लक्षात घेता, उमेदवारीसाठी अट्टहास केला जातो. हाच प्रकार डॉ. ओळंबे यांच्याबाबत घडला. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अकोला पश्चिममधून लढायचे, असा निर्णय त्यांनी घेतला होता. विविध कार्यक्रमांनाही त्यांनी हजेरी लावली, तर कधीही फारसा पैसा खर्च करणाऱ्या डॉ. ओळंबे यांनी गणेशोत्सव मंडळांना मदत केली. अकोला पश्चिममधून त्यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. त्यांच्यासोबत आणखी काही इच्छुक होते, परंतु अखेर गोवर्धन शर्मा यांनाच उमेदवारी जाहीर केली. या वेळी शर्मा यांची निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. मात्र, पक्षाचा आदेश त्यांनी शिरसावंद्य मानला. अशोक ओळंबे