आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंडखोरांकडे सर्वांच राजकीय पक्षांचे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विधानसभा निवडणुकीत या वेळी प्रथमच मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. राज्यातील सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष स्वबळावर लढत असल्यामुळे उमेदवारांची संख्या वाढली आहे. युती 25,तर आघाडी 15 वर्षांपासून एकत्र निवडणूक लढवत असल्यामुळे यंदा पहिल्यांदाच मित्रपक्षातील कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकले आहेत, तर ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही, त्यांनी बंडखोरीचा मार्ग निवडत आपल्या मित्रांसमोरच शड्डू ठोकला आहे. असे असले तरी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सर्वच पक्ष स्वबळावर निवडणुका लढवत असल्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत यंदा 199 उमेदवारांनी पाच मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मनसे वगळता सर्वच पक्षांत मोठ्या संख्येने बंडखोरी झाली. शेवटच्या दिवशीपर्यंत कोणत्याच पक्षाचे उमेदवार निश्चित झाल्यामुळे अनेकांनी लॉटरीमध्ये आपला नंबर लागेल, या आशेवर उमेदवारी अर्जावर पक्षाचे नाव टाकून उमेदवारी अर्ज भरले. पाचही मतदारसंघांमधून काँग्रेस पक्षात केवळ बाळापूरमध्ये उमेदवारीवरून रामायण घडले. उर्वरित मतदारसंघांमध्ये या पक्षाला बंडखोरांची चिंता नसल्याचे दिसून आहे.
उमेदवारांनी पाच मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल केले अाहेत.
बाळापूर मतदारसंघामध्ये सर्वाधिक बंडखोरी : बाळापूरमतदारसंघात सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी बंडखोरी करत अर्ज भरल्यामुळे हा मतदारसंघ सर्वांनाच सोयीचा वाटत असल्याचे दिसून येत आहे. भाजपमधील उमेदवारांनी या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भारिपने मात्र, या मतदारसंघात सावध पवित्रा घेत एक अधिकृत उमेदवार, तर दुसरा डमी उमेदवार उभा करून पक्षात बंडखोरी नसल्याचे दाखवून दिले आहे.