आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पंधरा वर्षांनंतर निवडणुकीत आमने-सामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- काँग्रेसआणि राष्ट्रवादी काँग्रेस १५ वर्षांनंतर विधानसभा निवडणुकीत एकमेकांना लढत देत आहे, तर भाजप-सेना विधानसभा निवडणुकीत प्रथमच एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडल्यानंतर १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्र उमेदवार दिले होते. दुर्दैवाने जिल्ह्यात केवळ अकोला मतदारसंघातच या दोन्ही पक्षांना प्रत्यक्ष एकमेकांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता होणाऱ्या निवडणुकीत कोण कोणाला शह देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडल्यानंतर अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पाचही जागा लढवता आल्या नव्हत्या. तर, काँग्रेसचीही तीच गत झाली. मूर्तिजापूर मतदारसंघात दोन्ही पक्षाला उमेदवार देता आला नाही. मात्र, आता परिस्थितीत बदल झाला आहे. इतर पक्षातील उमेदवार आयात करून या दोन्ही पक्षांनी सर्व मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. भाजपने राज्यात इतर ठिकाणी आयात केलेले उमेदवार दिले असले तरी जिल्ह्यात मात्र भाजपला तसेच शिवसेनेला करावे लागले नाही. या दोन्ही पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.
१९९९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बोरगावमंजू (अकोला पूर्व), अकोला, अकोट, तर काँग्रेस पक्षाने अकोला, बाळापूर या दोन मतदारसंघात उमेदवार दिले होते. मूर्तिजापूर मतदारसंघात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारच दिला नाही. काँग्रेसला बाळापूर मतदारसंघात विजय प्राप्त करता आला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही जागी विजय प्राप्त करता आला नाही. हे दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढल्याने भाजप-सेना युतीला दोन (दोन्ही भाजप), दोन भारिप-बमसं आणि एक जागा काँग्रेसला मिळाली होती. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेतून पक्षात प्रवेश घेतलेल्या गजानन दाळू गुरुजी आणि डॉ. जगन्नाथ ढोणे तसेच माजी राज्य मंत्री अरुण दिवेकर यांना मैदानात उतरवले होते. यात दाळू गुरुजी आणि डॉ. ढोणे यांना बऱ्यापैकी मते मिळाली. परंतु, अरुण दिवेकरांना अत्यंत कमी मतांवर समाधान मानावे लागले.
दोन्ही काँग्रेस एकमेकांविरुद्ध लढल्या असल्या तरी भाजप-सेनेची युती मात्र कायम होती. युती कायम असताना दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले असताना भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. यास कारण ठरले मत िवभाजनाचे. युती आणि आघाडी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच गोची होत आहे. या चार पक्षांच्या मत विभाजनाचा फायदा भारिप-बमसंला होतो का? याकडेच लक्ष लागले आहे.
कारे कोणाकडून आला?
उमेदवारीअर्ज दाखल करताना अनेक गमती-जमती घडल्या. युती आणि आघाडी हे चारही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना कार्यकर्ते तहसील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उभे होते. मात्र, या कार्यकर्त्यांचा एकमेकांना एकच प्रश्न होता, कारे कोणाकडून आलास?