आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चव्हाण हे \'लकवाछाप\' सीएम, राज्यात भाजप सरकार आल्यास एलबीटी रद्द- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राज्यातभाजपचे सरकार स्थापन झाल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एलबीटी रद्द करण्यात येईल, असे जाहीर आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती येथे सोमवारी दिले.
जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचाराकरिता ते सायंकाळी शहरात आले असता, नेहरू मैदानावरील जाहीर सभेत ते बोलत होते. व्यापारी स्थानिक संस्था करांमुळे त्रस्त असून, सत्तेवर आल्याबरोबर त्यांना दिलासा देण्यात येईल, असे सांगून कर गोळा करण्याचे अनेक मार्ग असून त्यापैकी एक स्वीकारू, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिनेश शर्मा, आमदार प्रवीण पोटे, रणजित पाटील, जयंत डेहणकर, किरण पातूरकर, किरण महल्ले, शंकराराव हिंगासपुरे, अनिल गोंडाणे, मिलिंद चिमोटे, अमरावतीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख, बडनेराचे तुषार भारतीय, मेळघाटचे प्रभुदास भिलावेकर, अचलपूरचे अशोक बनसोडे, तिवसाच्या निवेदिता चौधरी, मोर्शीचे डॉ. अनिल बोंडे, दर्यापूरचे रमेश बुंदेले या वेळी मंचावर उपस्थित होते. राजकारणात घराणेशाहीला जन्म देण्याचे पाप काँग्रेसने केले, असा आरोप करतानाच डॉ. सुनील देशमुखही घराणेशाहीचेच बळी असल्याचा उल्लेख गडकरी यांनी केला. देशात कृषी विकास दर मागे गेला. पहिल्या क्रमांकावरील महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर घसरले. अमरावती ते सुरत रस्ता चौपदरीकरणाचे कंत्राट एका कंपनीला मिळाले. मात्र, ते करायला तयार नव्हते. त्यांना वारंवार म्हणतोय, काम तुम्ही करा. मात्र, आता अमरावती-सुरत सात हजार कोटीचा नवा रस्ता आम्ही बांधून पूर्ण करणार. टेंडर निघाले असून लवकरच काम सुरू होईल. एक लाख 80 हजार कोटींची कामं बंद पडली आहेत. साडेतीनशे उड्डाण पुलांचे काम प्रलंबित होती. त्यांपैकी 75 पूल मंजूर झाले आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सोळाशेटींचा विकास कुठे?
पाचवर्षांत शहरात विकास झाल्यामुळे कुणाच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची, याचा नागरिकांनी विचार करावा, असे आवाहन डॉ. सुनील देशमुख यांनी केले. अमरावतीला 1600 कोटी मिळाले आणि त्यातून विकास झाला, असा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, १६०० कोटींचा विकास कुठे नाहीत, असेही ते म्हणाले.
'राज्यातभाजपचे एकछत्री सरकार निवडून दिल्यास पंचवीस वर्षांत जो विकास घडला नाही, तो आम्ही अवघ्या पाच वर्षांत करून दाखवू,' असा दावा ज्येष्ठ भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी ितवसा येथे केला. गडकरी ितवसा मतदारसंघातील उमेदवार निवेदिता चौधरी यांच्या प्रचाराकरिता येथे आले होते. या वेळी मंचावर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. दिनेश शर्मा, आमदार प्रवीण पोटे, आमदार रणजित पाटील, अरुण अडसड, निवेदिता चौधरी, दिनेश सूर्यवंशी उपस्थित होते. गडकरींनी जाहीर सभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, की राज्यात आतापर्यंत मी अनेक मुख्यमंत्री बघितले. विलासराव देशमुख, शरद पवार; सुधाकरराव नाईकांची कारकीर्द बघितली. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा 'लकवाछाप' मुख्यमंत्री बघितला नाही, असा घणाघाती शाब्दिक प्रहार गडकरी यांनी केला. राज्यातील आघाडी सरकारला हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले. आबा, दादा, बाबा यांच्या गाड्या भंगार झाल्या असून, जोपर्यंत त्यांना धक्के मारून बाहेर हाकलत नाहीत, तोपर्यंत चांगले दिवस येणार नाहीत, असेही गडकरी म्हणाले.
राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज
राज्य सरकारवर सध्या तीन लाख कोटींचे कर्ज असून, दिवाळखोरीची शक्यता आहे. कर्ज चुकवल्यास राज्यावर गंभीर आर्थिक संकटाचा धोका आहे. सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कुपोषित बालकांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, असेही गडकरी म्हणाले.
राजीव जामठे भाजपमध्ये
मागील लोकसभा निवडणुकीत 'प्रहार'च्या झेंड्याखाली निवडणूक लढवणारे डॉ. राजीव जामठे यांनी तिवसा येथे गडकरींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये त्यांनी सत्तर हजार मते घेतली होती.