आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रतन डेंडुले काँग्रेसमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- युवककाँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचा रस्ता धरल्याच्या घोषणेला २४ तासही उलटत नाहीत, तोच सोमवारी भाजपचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांच्या गटाला जबर राजकीय हादरा बसला.
काँग्रेसमधून बाहेर पडल्यापासून डॉ. देशमुख यांच्या समवेत असलेले माजी नगरसेवक रतन डेंडुले यांनी समर्थकांसह अखेर आमदार रावसाहेब शेखावत यांच्याशी 'हात'मिळवणी केली. आपल्या असंख्य समर्थकांसह डेंडुले यांनी सोमवारी सायंकाळी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला. आमदार रावसाहेब शेखावत यांच्यासह शहराध्यक्ष संजय अकर्ते, वसंतराव साऊरकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, जितू ठाकूर आदी या वेळी उपस्थित होते. पक्षप्रवेश केल्यानंतर डेंडुले यांनी डॉ. देशमुख यांच्यावर प्रहार करत आमदार रावसाहेब शेखावत यांचे कौतुक केले. आपण तन, मन, धनाने काँग्रेसचेच आहोत. केवळ एका व्यक्तीवर अन्याय झाल्याने थोडे नाराज होतो. मात्र, डॉ. देशमुख यांनी चुकीचा मार्ग अवलंबल्याने आपण स्वगृही परत असल्याचे डेंडुले यांनी नमूद केले. डेंडुले स्वगृही परत आल्याने काँग्रेसची ताकद वाढल्याचे आमदार शेखावत यांनी या वेळी स्पष्ट केले. डेंडुले यांच्या प्रवेशानंतर अामदार शेखावत यांनी त्यांचे अभिनंदन केले.