आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Elections,latest News In Divya Marathi,

दहा जणांची केली हकालपट्टी, काँग्रेसमध्ये कधी गळती तर कधी हद्दपारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- काँग्रेसमध्ये सोडून जाणा-यांची लाट ओसरायचे नाव घेत नसताना आता पक्षानेच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत सहा नगरसेवकांसह दहा जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या गळती हद्दपारीमुळे काँग्रेस पक्ष सुकडण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसकडून विधानसभेत उमेदवारी मिळण्यासाठी विजय देशमुख फिल्डिंग लावून बसले होते. परंतु, काँग्रेसने उषा विरक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे विजय देशमुख यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपली अकोला पश्चिममधून उमेदवारी दाखल केली. महापािलकेत काँग्रेसचे १८ नगरसेवक आहेत. यापैकी सात ते आठ नगरसेवक विजय देशमुख यांनीच निवडून आणले आहेत. त्यामुळे या नगरसेवकांना पूर्वीपासून विजय देशमुख गटाचे म्हटले जाते. त्यामुळे अनेक नगरसेवक काँग्रेस पक्षाऐवजी विजय देशमुख यांचा प्रचार करत आहेत. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी झाल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत, काँग्रेस पक्षाने हकालपट्टीची ही कारवाई केली. पक्षाचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी माणिकराव ठाकरे यांच्या आदेशान्वये ऑक्टोबरला, माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी, नगरसेविका रिजवाना शेख अजीज, नगरसेवक दिलीप देशमुख, नगरसेविका जया गेडाम, कोकिळा डाबेराव, निकहत अफसर कुरेशी तसेच जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस राजेश भारती, माजी नगरसेविका सुषमा निचळ, काँग्रेसचे अकोला शहर अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शेख अजीज शेख सिकंदर, अकोला शहर काँग्रेस समितीचे महासचिव अफसर कुरेशी या दहा जणांची हकालपट्टी केली.
कारवाईकधी? : उमेदवारीअर्ज दाखल करताना काँग्रेसच्या एका नगरसेवकाने एका राष्ट्रीय पक्षाकडून एबी फॉर्मसह उमेदवारी दाखल केली होती. नंतर त्याने उमेदवारी मागे घेतली. परंतु, या नगरसेवकावर पक्षाने कारवाई का केली नाही, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत.
नगरसेवकनिलंबनाच्या वाटेवर : काँग्रेसपक्षाचे १८ पैकी १० ते १२ नगरसेवक स्वत:च्या पक्षाच्या उमेदवाराऐवजी दुसऱ्या पक्षाचा प्रचार करत आहेत. काँग्रेसने तूर्तास सहा नगरसेवकांना निलंबित केले आहे. त्यामुळे आणखी तीन ते चार नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते.
समितीचे अस्तित्व नाही
पक्षविरोधी कारवाया करणा-यावर कारवाई करण्यासाठी पक्षाने पक्षविरोधी कारवाया वॉच समितीची घोषणा केली होती. समितीतील इतर सदस्यांची नावे निश्चित झाली नाहीत, त्यामुळे समिती पूर्णत: गठित झाल्याने समितीने कुठलाही अहवाल अद्याप दिला नाही. त्यामुळे समितीने कुणाच्याही विरोधात कारवाई सूचित केली नाही. समितीचा संबंध नाही.'' दिनेशशुक्ला, अध्यक्षकाँग्रेस पक्षविरोधी कारवाया वॉच समिती, अकोला
आता थेट प्रचार
पक्षानेचपुढील आदेशापर्यंत पक्षातून निलंबित केल्याने आता आमच्या नेत्याचा थेट प्रचार करता येणार आहे. यापूर्वी थेट प्रचार करता येत नव्हता.'' अफसरकुरेशी